विधानसभा निवडणूक लढवणार नाही पण…एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

विधानसभा निवडणूक लढवणार नाही पण…एकनाथ खडसे यांचे वक्तव्य

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी (दि.12) पत्रकारांशी बोलताना विधानसभा निवडणूक लढवणार नाही पण मरेपर्यंत राजकारण सोडणार नाही, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, मी सध्या विधान परिषदेचा सदस्य आहे. नैतिकतेमुळे येत्या काळात विधानसभा निवडणूक लढवणार नाही. माझ्या परिवारात खासदार पद असल्यामुळे भविष्यात मी खासदारकीची निवडणूक  लढणार नाही. छोट्या छोट्या निवडणूकांत जिल्हा बँक, दूध संघ इतर मध्ये निवडून आलेलोच आहे. त्यामुळे आज तरी त्या निवडणुकांबद्दल निर्णय घेण्याचा प्रश्न येत नाही.
रोहिणी खडसे यांनाही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी ते मान्य केले नाही. शरद पवार यांच्या सोबतच राहून काम करणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना त्यांचे मत आणि स्वातंत्र आहे. त्यामुळे मी जास्त आग्रह केला नाही. तसेच मी मरेपर्यंत संन्यासही घेणार नाही असे एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा :

IPL 2024 : चेन्नईने कायम राखले आव्हान; राजस्थानविरूद्ध पाच गडी राखून विजय
कोल्हापूर : कासारी धरणात ३४ टक्के पाणीसाठा 
कोल्हापूर : कासारी धरणात ३४ टक्के पाणीसाठा