ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे रविवारी (दि.१२) निधन झाले. रंगमंचावर काम करत असतानाच त्यांनी स्टेजवरच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती अभिनेते, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली.
राजेश देशपांडे यांच्या सृजनोस्तव हा रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता. ‘सृजन द क्रिएशन’ या त्यांच्या संस्थेचा चौथा वर्धापन दिन म्हणून काही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या रंगोत्सवात सतीश जोशी हेही महत्वपूर्ण भूमिकेत होते. कार्यक्रम सुरू असताना अचानक ते स्टेजवरून खाली कोसळले.
सतीश जोशी यांनी आजवर अनेक नाटक, मालिका तसेच चित्रपटातून काम केले आहे. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये सतीश जोशी यांना भूमिका ठरलेल्या असायच्या. साहित्य संघाच्या मच्छकटिका नाटकातून काम केले होते. जोशी निधनाने मराठी सिने आणि नाट्यसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते अतुल काळे यांनीही सतीश जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जोशी गुरुजी गेले, मी त्यांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखतो, मला व माझ्या कुटुंबाला त्यांनी खूप मोठा आधार दिला होता, असे ते भावुक होऊन म्हणाले.