दिल्लीत शाळांनतर रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दिल्लीत शाळांनतर रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता दोन रुग्णालयांना बॉम्बने धमक्या मिळाल्या आहेत. धमकी देणाऱ्याने धमकीचा ईमेल पाठवला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धमकीचा ई मेल संजय गांधी हॉस्पिटल आणि बुरारी हॉस्पिटलला मिळाला आहे.
पोलिसांसह अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
धमकीचा ई मेल मिळाल्‍यानंतर रुग्‍णालयांच्‍या प्रशासनाने तत्‍काळ तक्रार केली. पोलीस, अग्निशमन विभाग आणि सर्व नागरी यंत्रणांव्यतिरिक्त बॉम्ब आणि श्वान पथक घटनास्थळी धाव घेतली आहे. रुग्णालयात शोधमोहीम सुरू आहे. मात्र, आतापर्यंत रुग्णालय परिसरातून काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.
दिल्‍लीतील शाळांनाही मिळाली होती धमकी
1 मे रोजी दिल्‍लीतील 223 शाळांना बॉम्ब पेरण्यात आल्याचे ई-मेल पाठवण्यात आले होते. ईमेलमध्ये घृणास्पद भाषेचा वापर करण्यात आला होता. या धमक्‍यांचीही पोलिसांसह प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती.

Two hospitals receive bomb threat in Delhi, bomb disposal team at spot
Read @ANI Story | https://t.co/GmTE9kTgql#bombthreats #bombdisposalteam pic.twitter.com/tAcBUoeQqy
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2024

हेही वाचा : 

Narendra Modi: ‘आमच्यासाठी प्रत्येक दिवस मातृदिन..’: ‘त्‍या’ चित्रांनी PM मोदींच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य
झारखंडचे मंत्री आलम हाजीर हो! ३७ कोटी जप्त प्रकरणी ‘ईडी’चे समन्‍स
दिल्लीत भाजपचा घरोघरी प्रचार, तर आप, काँग्रेसचाही बैठकांचा धडाका

 
 

Go to Source