केजरीलांची पहिली गॅरंटी, “देशभरात 200 युनिट मोफत वीज”

केजरीलांची पहिली गॅरंटी, “देशभरात 200 युनिट मोफत वीज”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जनतेला ‘या’ १० गॅरंटी मिळणार असल्याचे आश्वासन आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. यामध्ये सर्वप्रथम देशातील जनतेला २०० युनिट वीज मोफत मिळणार असल्याचे पहिले अश्वासन केजरीवाल यांनी दिले. आप आमदार बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते (Arvind Kejriwal) बोलत होते.
पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, “माझ्या अटकेमुळे लोकसभा गॅरंटी घोषणा करण्यास उशीर झाला; पण निवडणुकीचे बरेच टप्पे अजून बाकी आहेत. मी (Arvind Kejriwal) इंडिया आघाडीतील इतर सदस्यांशी अद्याप चर्चा केलेली नाही;पण कोणाला काही अडचण येणार नाही याची मला गॅरंटी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 केजरीवालांचे ‘मिशन’ लाेकसभा सुरु

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी निवास्थानी आप आमदारांची बैठकी घेतली.
येणाऱ्या काळात केवळ आम आदमी पार्टीच देशाला भविष्य देऊ शकते, असे बैठकीत  केजरीवाल म्हणाले.
यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी १० गॅरंटी दिल्या आहेत.
आपने १० गॅरंटीमध्ये मोफत वीज, शिक्षण आणि आरोग्याला प्राध्यान्य दिले आहे.

Arvind Kejriwal: लोकसभा पार्श्वभूमीवर केजरीवांच्या १० गॅरंटी
1. देशात 200 युनिटपर्यंत मोफत वीज
इंडिया’ आघाडी सत्तेत आल्यास “देशातील सर्व गरिबांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज” देण्याची घोषणा केजरीवाल केली आहे. १० गॅरंटीपैकी ही पहिली आहे. देशात २४ तास वीज देऊ. देशात ३ लाख मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे, पण वापर फक्त २ लाख मेगावॅट आहे. आपला देश उत्पादन करू शकतो. मागणीपेक्षा जास्त वीज आम्ही देऊ शकतो, असेही केजरीवाल म्हणाले.

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal announces to provide up to 200 units of free electricity to all the poor in the country if voted to power.
He says “Out of the 10 guarantees, the first guarantee is that we will provide 24-hour electricity in the country. The country has the… pic.twitter.com/ShOE2AxR53
— ANI (@ANI) May 12, 2024

2. सर्वांसाठी उत्तम आणि उत्कृष्ट मोफत शिक्षणाची व्यवस्था
आज आमच्या सरकारी शाळांची स्थिती चांगली नाही. आमची दुसरी गॅरंटी आहे की, “आम्ही सर्वांसाठी उत्तम आणि उत्कृष्ट मोफत शिक्षणाची व्यवस्था करू”. सरकारी शाळा खाजगी शाळांपेक्षा चांगले शिक्षण देतील. आम्ही ते दिल्ली आणि पंजाबमध्ये केले आहे. यासाठी 5 लाख कोटी रुपये लागणार आहेत. राज्य सरकारे 2.5 लाख कोटी रुपये देणार असून केंद्र सरकार यासाठी 2.5 कोटी रुपये देणार, असेही ते म्हणाले.

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says “…Today, the condition of our government schools is not good. Our second guarantee is that we will arrange good and excellent free education for everyone. Government schools will provide a better education than private schools. We have… pic.twitter.com/HuAOmhJjam
— ANI (@ANI) May 12, 2024

3. उत्तम आरोग्यसेवा
आज आपल्या देशातील सरकारी रुग्णालयाची स्थिती चांगली नाही. आमची तिसरी गॅरंटी आहे ती “उत्तम आरोग्यसेवा”. आम्ही प्रत्येकासाठी चांगल्या उपचारांची व्यवस्था करू. प्रत्येक गावात, प्रत्येक परिसरात मोहल्ला दवाखाने उघडले जातील. 5 लाख कोटी रुपये खर्चून जिल्हा रुग्णालयाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे.

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says “…Today, the condition of our government hospital is not good in our country. Our third guarantee is better healthcare. We will arrange good treatment for everyone. Mohalla clinics will be opened in every village, every locality. District… pic.twitter.com/fUt6gjXRxr
— ANI (@ANI) May 12, 2024

4. राष्ट्र सर्वोच्च: चीनने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली भारतीय जमीन परत आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला दिले जाईल.
5. देशाचे सैनिक: अग्निवीर योजना बंद करून सर्व लष्करी भरती जुन्या प्रक्रियेनुसार केली जाईल. आतापर्यंत भरती झालेल्या सर्व फायर वॉरियर्सची पुष्टी केली जाईल.
6. देशाचे शेतकरी: स्वामिनाथन आयोगानुसार सर्व पिकांवर एमएसपी निश्चित करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पूर्ण भाव दिला जाईल.
7. लोकशाही : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल.
8. बेरोजगारी : पद्धतशीरपणे बेरोजगारी दूर केली जाईल. पुढील एका वर्षात 2 कोटी रोजगार निर्माण होतील.
9. भ्रष्टाचार: भाजपची वॉशिंग मशीन उद्ध्वस्त होईल. प्रामाणिक लोकांना तुरुंगात पाठवण्याची आणि भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्याची सध्याची व्यवस्था संपुष्टात येईल. दिल्ली, पंजाबप्रमाणेच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारावरही प्रहार होईल.
10. व्यवसाय:  जीएसटी दहशतवाद (कर दहशतवाद) संपुष्टात येईल. जीएसटी पीएमएलएमधून काढला जाईल. व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी सर्व कायदे आणि प्रशासकीय यंत्रणा सुलभ करण्यात येतील.

हेही वाचा:

Arvind Kejriwal: केजरीवालांच्या निवासस्थानी ‘आप’ आमदारांची खास बैठक
Arvind Kejriwal | मोदींनंतर भाजपचा पंतप्रधान कोण? : केजरीवालांचा सवाल
BJP : नरेंद्र मोदींनंतर कोण पंतप्रधान? भाजपने दिले केजरीवालांना उत्तर