उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत …

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली, असा टोला त्यांनी लगावला आहे.
बावनकुळे यांनी एक्सवर लिहिले आहे की, ठाकरे यांनी दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करावी. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता? याचे उत्तर द्यावे. सत्तेवर आल्यास हिंदुंची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात?, राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात? उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता? हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे,” असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार ४ जूननंतर पडणार: नाना पटोले
केजरीवालांचे ‘मिशन’ लाेकसभा सुरु, ‘आप’ आमदारांची घेतली बैठक
केंदूरसह दुष्काळग्रस्त गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारच : अजित पवार