कोहली मैदानात उतरताच रचणार इतिहास! ‘या’ बाबतीत बनणार जगातील पहिला क्रिकेटर

कोहली मैदानात उतरताच रचणार इतिहास! ‘या’ बाबतीत बनणार जगातील पहिला क्रिकेटर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आरसीबीचा सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये नवा विक्रम रचणार आहे. तो आयपीएलमध्ये एकाच फ्रेंचायझीसाठी 250 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनणार आहे. इतर कोणत्याही क्रिकेटपटूला अद्याप ही कामगिरी करता आलेली नाही.
विराट कोहली रचणार इतिहास

IPL मध्ये एकाच फ्रँचायझीसाठी 250 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनणार
कोहलीचे आरसीबीकडून 2008 मध्ये पदार्पण
केवळ आरसीबीचेच प्रतिनिधित्व 
आरसीबीसाठी कोहलीचा 17 वा आयपीएल हंगाम

IPLच्या गेल्या 17 हंगामात केवळ आरसीबीचेच प्रतिनिधित्व
कोहलीने यापूर्वीच आधीच आरसीबीसाठी 250 सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला आहे आणि त्याची बरोबरी एमएस धोनीने केली आहे. पण आयपीएल सारख्या जगप्रसिद्ध लीगमध्ये एका संघासाठी 250 सामने खेळणारा कोहली हा जगातील पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू असेल. आयपीएलच्या गेल्या 17 हंगामात त्याने आतापर्यंत केवळ आरसीबीचेच प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 2008 मध्ये आरसीबीसाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो याच संघाकडून खेळत आहे.
कोहलीने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी 249 सामने खेळले आहेत. तो ज्या मैदानावर आयपीएलचा पहिला सामना खेळला होता त्याच मैदानावर तो आरसीबीसाठी 250 वा सामना खेळणार आहे. सीएसकेच्या धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत, परंतु तो दोन वर्षे रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. अशा परिस्थितीत एका फ्रँचायझीसाठी एकाच लीगमध्ये 250 सामने खेळणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर ठरणार आहे.
कोहलीचे आयपीएल रेकॉर्ड
आरसीबीसाठी, कोहलीने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 249 सामन्यांच्या 241 डावांमध्ये 37 वेळा नाबाद राहताना एकूण 7897 धावा केल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 113 धावा आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 शतके झळकावली आहेत. शिवाय त्याच्या बॅटमधून 55 अर्धशतकेही आली आहेत. त्याची सरासरी 38.71 आहे आणि स्ट्राइक रेट 131.64 आहे. त्याच्या खात्यात 698 चौकार आणि 264 षटकार जमा झाले आहेत.