DC vs RCB : दिल्ली कॅपिटलची आज बंगळुरूशी चुरशीची लढत होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

DC vs RCB : दिल्ली कॅपिटलची आज बंगळुरूशी चुरशीची लढत होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

आयपीएल 2024 चा 62 वा सामना रविवारी रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात  रविवार, 12 मे रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार असून दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळणार. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.

आरसीबीसाठी हा करो किंवा मरोचा सामना आहे. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी संघाला विजय मिळवावी लागणार. बेंगळुरू संघाचा पराभव झाल्यावर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर दिल्ली संघ पराभूत झाल्यावर देखील प्लेऑफच्या शर्यतीत राहणार.दिल्ली संघ 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. 

आजच्या सामन्यात दिल्ली संघाचे नेत्तृत्व ऋषभ पंत च्या जागी अक्षर पटेल करणार आहे.  स्लो ओव्हर रेटमुळे पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत डेव्हिड वॉर्नर प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करू शकतो असे मानले जात आहे. सलग चार सामन्यांत विजय मिळवून संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

 
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली, फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार आणि विल जॅक यांची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले आहेत.बेंगळुरूने 18 सामने जिंकले आहेत तर दिल्लीने 11 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला.

 

दोन्ही संघांचे प्लेइंग 11 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोड, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी.

 

दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

Edited by – Priya Dixit 

 

 

 

Go to Source