Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस ‘लिमिट’

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीस मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार देशी-विदेशी आणि बियर हे मर्यादित साठ्यातच विकावी लागणार आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक मद्य विक्री दुकाने सायंकाळीच बंद झाली. लोकसभा निवडणूकीत मतदारांना अनेक लोभ दाखवून आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य …
Nashik News : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस ‘लिमिट’

नाशिक, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीस मर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार देशी-विदेशी आणि बियर हे मर्यादित साठ्यातच विकावी लागणार आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक मद्य विक्री दुकाने सायंकाळीच बंद झाली.
लोकसभा निवडणूकीत मतदारांना अनेक लोभ दाखवून आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून मद्याचे आमिष दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना जास्त प्रमाणात मद्य विक्री करणाऱ्या चार मद्य विक्री दुकानांचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्याचप्रमाणे मद्य विक्रेत्यांना मद्य विक्रीस मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यानुसार देशी, विदेशी, बिअर विक्रीस लिमिट दिले आहे. शनिवारी अनेकांनी मद्यविक्रीचे लिमिट ओलांडल्याने मदविक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांना मद्यासाठी शोधा-शोध करावी लागली. रात्री नऊ पर्यंत बहुतांश मदविक्री दुकाने
बंद झाली होती.
आखून दिलेली मद्यविक्री मर्यादा
देशी मद्य – 15 खोके
विदेश मद्य – 35 खोके
बिअर – 30 खोके
हेही वाचा :

वर्धा : ५२१ ग्रामपंचायतींत १५ लाखांचे डिजीटल पेमेंट
सिन्नर एमआयडीसीत बालकाचा खून; संशयितास अटक
Beed News : चिंचोलीमाळी येथे शेतकऱ्याने जीवन संपवले