मुंबई : लोखंडी खांबावर डंपर आधळल्याने चालकाचा मृत्यू

मुंबई : लोखंडी खांबावर डंपर आधळल्याने चालकाचा मृत्यू

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपाड्याहून मुंबई सेंट्रल बेलासीस पुलाच्या दिशेने वेगाने जाणारा डंपर लोखंडी खांबावर आदळल्याने डंपरचा चालक रामू यादव वय ५७ वर्षे ह्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याचा सोबत असलेली व्यक्ती मात्र ह्या भयंकर अपघातात नशिबाने वाचली आहे.
मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पुल हा ब्रिटिशकालीन तसेच धोकादायक झाल्यामुळे लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. ह्या पुलाचे पाडकाम आणि पुलावरील अवजड वाहतूक थांबवण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील पुलाच्या सुरवातीच्या चढणा जवळ लोखंडे भीम उभारण्याचे काम काल रात्री पासून पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होते.
काम आटपल्यवर खांब भोवती कोणतेही सूचना फलक अथवा लाल रंगाचे निशाण न लावताच साईड इंजिनीयर व कामगार मंडळी तेथून पसार झाली. वेल्डिंग करून लोखंडी खांब उभारल्यामुळे हा खांब काळसर पडला होता. त्यामुळे अंधारात तो दिसेनासा झाला होता. खांबाच्या अवतीभोवती कंत्राटदाराने सुरक्षेसाठी बॅरिगेड देखील लावले नव्हते. काही वेळाने पहाटे साधारण ५:३० च्या सुमारास नागपाडा येथून एक भरधाव वेगात येणार डंपर मुंबई सेंट्रलचा सिग्नल क्रॉस करून थेट बेलासिस पुलाच्या दिशेने जात होता.
त्यावेळेस तो डंपर पुलाच्या पडकामासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबाला जोराने आधळला धडक ही इतकी जोरात  होती की, वाहन चालकाच्या शरीरामध्ये स्टेरिंगच्या लोखंडी शिगा घुसल्या होत्या. त्या कटरने कापून वाहन चालकाला बाहेर काढण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामध्ये मात्र वाहन चालक रामू यादव ह्या व्यक्तीला आपला जीव गमावा लागला. तर, वाहन चालकासोबत असणारा चेतन गुप्ता नामक चालका मागे झोपला असता डंपरची धडक बसल्यावर तो आपसूकच दरवाजा उघडन बाहेर फेकला गेला. सदर डंपर चालक रामू यादव यांच्या स्वतःचा मालकीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारी व खाजगी मालाची आवक-जावक करून डंपर चालक रामू यादव स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता.