नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या तोफा धडाडणार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार जोरदारपणे सुरू आहे. त्याचा धसका विरोधकांनी घेतला असून, त्यांच्या प्रचारार्थ पुढील आठवड्यात महाआघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. Lok Sabha Election 2024
वाजे यांच्या प्रचारार्थ विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन व प्रचार यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांची बैठक शालिमार चौकातील शिवसेना जिल्हा कार्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
शनिवारी (दि. ११) खासदार संजय राऊत यांची सातपूर आणि मध्य नाशिक, रविवारी (दि. १२) सुषमा अंधारे यांची देवळाली कॅम्प, मंगळवारी (दि. १४) इम्रान प्रतापगढी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चौक मंडई तर बुधवारी (दि. 15) उद्धव ठाकरे यांची अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार असल्याने त्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले, शहराध्यक्ष गजानन शेलार, सचिन मराठे, डी. जी. सूर्यवंशी, माजी महापौर यतीन वाघ, बाळासाहेब वाघ आदी उपस्थित होते.
हेही वाचा –

भर पावसातही पोलिसांकडून नाकाबंदी; एसएसटी पथकाकडून 24 तास तपासणी
Nashik ZP News | डीपीसी निधी खर्चात नाशिक जिल्हा परिषद अव्वल