खा. डॉ. अमोल कोल्हें पाच वर्षे ‘या’ क्षेत्रातून घेणार ब्रेक..

खा. डॉ. अमोल कोल्हें पाच वर्षे ‘या’ क्षेत्रातून घेणार ब्रेक..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत अनेक कामे केली आहेत. अनेक प्रकल्प मंजूर करून आणले आहेत. माझ्या मतदारसंघात कामे सुरू असलेले व कामे सुरू होणारे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी वेळ द्यावा लागणार असून, त्यासाठी पुढील पाच वर्षे मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय खा.डॉ.अमोल कोल्हे यांनी जाहीर केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न गेल्या पाच वर्षांत आपण मार्गी लावले आहेत. पुणे-नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे- नगर या महामार्गांच्या कामासाठी आपण तब्बल साडेएकोणीस हजार कोटी रुपयांचा निधी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून आणलाय, याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व प्रकल्प मार्गी लावणे गरजेचे आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रवी दर्शन चौकापासून यवत (ता.दौंड)पर्यंतच्या एलिव्हेटड कॉरिडॉरचा ‘डीपीआर’ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केलाय, त्यांच्या मंजुरीची आपण वाट पाहतोय, असे सांगून खा.डॉ.कोल्हे म्हणाले, इंद्रायणी मेडीसिटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प हा आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात आणतोय. आदिवासी भागामधल्या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीने राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्राच्या प्रकल्पाचा डीपीआर तयार करून आयुष मंत्रालयाला सादर केलाय. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीसाठी आहे.
पंधरा वर्षांत एका व्यक्तीला खासदारकीची संधी दिल्यानंतर पंधरा वर्षांत त्यांनी शिरूर मतदारसंघात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता. मात्र, माझ्या अवघ्या पाच वर्षांत हे सर्व प्रोजेक्ट आले आहेत, मार्गी लागले आहेत. या सर्व बाबी प्रत्यक्षात येण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देता येणं शक्य नाही, त्यामुळे हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मालिका विश्वातून अभिनयाला पाच वर्षांसाठी ब्रेक द्यावा लागणार आहे. मला माहिती आहे अनेक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते. परंतु
ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकण्याचे ठरविले आहे त्यांच्यासाठी मला मालिका विश्वातील अभिनयातून पाच वर्षे ब्रेक घ्यावा लागेल, असेही खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
हेही वाचा

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी दिल्लीत सहपत्नी हनुमानाचे दर्शन घेतले
Nashik News | साथरुग्णांची माहिती दडविणाऱ्या रुग्णालयांवर गुन्हा, महापालिकेचा इशारा
Loksabha election | भाजपच्या थापेबाजीला पुणेकर चाप लावणार : रवींद्र धंगेकर