गावच्या रांगड्या मातीतली हळव्या प्रेमाची कथा ‘गाभ’ लवकरच भेटीला

गावच्या रांगड्या मातीतली हळव्या प्रेमाची कथा ‘गाभ’ लवकरच भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘गाभ’ चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी रुपेरी पडद्यावर २१ जूनला येत आहे. ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत.
मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून ‘गाभ’ चित्रपटाची कथा मांडली आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे यांनी आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारली आहे. स्वत:च्या म्हशीसाठी एका रेड्याचा शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ चित्रपट आहे.

‘गाभ’चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत, आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. रंगभूषा विजय ढेरे, वेशभूषा चैताली गानू, केशभूषा रामेश्वरी, मोहिनी चव्हाण यांची आहे.
हेही वाचा-

Border-2 : सनी देओल -आयुष्मानच्या ‘बॉर्डर-२’ ची रिलीज डेट ठरली?
परी परी है एक परी आसमाँ..Shehnaaz Gill चा नवा लूक पाहून नेटकऱ्यांच्या मनात मात्र वेगळेच!
Suhana Khan : सुहाना- अगस्त्य नंदाच्या लग्नाची बोलणी?; डेटिंगच्या चर्चेत ‘लव्हबर्ड’ डिनर डेटवर