सांगली: कडेगाव-पलूसमध्ये दुपारपर्यंत 39.73 टक्के चुरशीने मतदान

सांगली: कडेगाव-पलूसमध्ये दुपारपर्यंत 39.73 टक्के चुरशीने मतदान

कडेगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघात 285 मतदान केंद्रावर मंगळवारी (दि.७) अत्यंत शांततेत व चुरशीने मतदान पार पडले. यामध्ये महिला, अबालवृद्ध तरुणांसह अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 39.73 टक्के मतदान झाले. सकाळी मतदान अत्यंत संथ गतीने झाले. सकाळी 9 पर्यंत केवळ 3.92 टक्के मतदान झाले. तर 11  पर्यंत केवळ 13.58 टक्के मतदान झाले. परंतु 11 नंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी 1 पर्यंत 26.80 टक्के मतदान झाले. तर दुपारी 3 पर्यंत 39.73 टक्के मतदान झाले.
पलूस-कडेगाव मतदार संघात एकूण 2 लाख 84 हजार 575 मतदार आहेत.यामध्ये 1 लाख 43 हजार 049 पुरुष तर 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि इतर 8 मतदारांचा समावेश आहे. दरम्यान दुपारी 3 पर्यंत 39.73 टक्के मतदान झाले. यामध्ये 1 लाख 30 हजार 60 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवला.

 
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत रखरखत्या उन्हात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बूथ केंद्रावर चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आली. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचले. अबालवृद्ध व अपंगांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अपंगांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर शासनाकडून व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. तसेच नुकतेच आता मतदानाचा हक्क मिळवलेल्या तरुणांईने देखील आपले पाहिले मतदान उत्साहात केले.
माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी पत्नी स्वप्नाली कदम व आई विजयमाला कदम यांच्यासांबत सेानसळ (ता. कडेगाव) येथे मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार मोहनराव कदम, युवा नेते शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी चिंचणी (ता. कडेगाव) येथे मतदान केले. भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह देशमुख यांनी कडेपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले , सहाय्यक निवडणूक निर्णय अजित शेलार, दीप्ती रीटे, नायब तहसीलदार सागर कुलकर्णी आदींसह मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 यंत्रात बिघाड :
अंकलखोप (ता.पलूस) येथे व ढाणेवाडी (ता.कडेगाव) येथे मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाल्याने प्रशासनाच्यावतीने येथे मतदान यंत्रे बदलण्यात आली.
नेत्यांच्या भेटी :
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम तसेच भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख , माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड, युवा नेते शरद लाड यांनी कडेगाव व पलूस तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.  व कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
दुपारच्या सत्रानंतर रांगा :
कडक उन्हामुळे दुपारच्या सत्रात मतदान केंद्रावर मतदारांची संख्या रोडावली होती. तर ‘सकाळ’च्या व दुपारनंतरच्या सत्रात मात्र सर्व मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लागल्या होत्या.
आकर्षक मतदान केंद्रे बनली सेल्फी पॉइंट :
कडेगाव येथे दिव्यांग व सखी मतदान केंद्र आकर्षकपणे सजवण्यात आली होती. त्यामुळे ही केंद्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच येथील सेल्फी पॉईंटमध्ये मतदानानंतर अनेक मतदारांनी सेल्फी काढली.
हेही वाचा 

सांगली: आटपाडी तालुक्यात १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान
सांगली: खानापूर मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत 38 टक्के मतदान
Sangli Lok Sabha Election सांगलीमध्ये दोन तासात केवळ 5.81 टक्के इतकेच मतदान