कोल्हापूर : हवा प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत होतेय वाढ

कोल्हापूर : हवा प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत होतेय वाढ

[author title=”आशिष शिंदे” image=”http://”][/author]
कोल्हापूर : हवेतील प्रदूषण आता माणसांसाठी जीवघेणे ठरत आहे. यामुळे अस्थमा, न्यूमोनिया आणि श्वसनाच्या इतर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. न्यूमोनिया आणि अस्थमामुळे गेल्या वर्षभरात 248 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. श्वसनाचे आजार हे मृत्यूचे वरवरचे कारण असले तरी हे आजार होण्यास हवेचे प्रदूषणही तितकेच कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
1998 पासून साजरा केला जातोय अस्थमा दिन
अस्थमाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यंदाच्या जागतिक अस्थमा दिनाची थीम ‘अस्थमाबद्दल जनजागृती आणि सक्षमीकरण’ आहे. श्वसनाच्या आजारांबद्दल व अस्थमाविषयी जगभरात जनजागृती व्हावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 1998 पासून अस्थमा दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
पार्टिक्युलेट मॅटर आणि ओझोन प्रदूषण बनले गंभीर
हवा प्रदूषणाचा गंभीर आघात थेट मानवी आरोग्यावर होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. कोल्हापूरच्या हवेत अतिसूक्ष्म धुलिकणांचे (पार्टिक्युलेट मॅटर) वाढलेले प्रमाण व ओझोनसारख्या गंभीर प्रदूषकामुळे हवा मानवी आरोग्यासाठी धोकादयक बनली आहे. यामुळे हे वाढते वायू प्रदूषण त्वरित नियंत्रणात न आल्यास अस्थामा असणार्‍या रुग्णांना गंभीर परिणांमाना सामोरे जावे लागू शकते.
गेल्या वर्षातील श्वसनाचे रुग्ण
इमर्जन्सी रुग्ण 383
तीव्र श्वसन संक्रमण आजार 373
नेब्युलायझेशन दिलेले रुग्ण 373
रुग्णालयात दाखल करावे लागलेले रुग्ण 366
ऑक्सिजन लावावे लागलेले रुग्ण 210
व्हेंटिलेटर लावाले लागले रुग्ण 109
अस्थमाची लक्षणे
श्वास घेण्यास त्रास, श्वासोच्छ्वासावेळी आवाज येणे, छातीत दुखणे, छाती गच्च झाल्यासारखे वाटणे
श्वसनाच्या आजाराने झालेले मृत्यू
पुरुष 147
महिला 101