पतीसोबत भांडणाचा राग; पत्‍नीने मुलाला फेकले मगरींच्या कालव्यात

पतीसोबत भांडणाचा राग; पत्‍नीने मुलाला फेकले मगरींच्या कालव्यात

Bharat Live News Media ऑनलाईन : कर्नाटकात एक धक्‍कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्‍या वादानंतर रागाच्या भरात पत्‍नीने आपल्‍या स्‍व:तच्या ६ वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकून दिल्‍याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलाला शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी शोध पथकाला मगरीच्या जबड्‍यात मुलाचा मृतदेह आढळून आला. त्‍या मुलाच्या मृतदेहाचे काही भाग मगरीने खाल्‍ले होते. यातील काही भाग पथकाने मिळवले. पोलिसांनी हत्‍येचा गुन्हा दाखल करत संबंधित महिला आणि तीच्या पतीला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना उत्‍तर कर्नाटकच्या कन्नड जिल्‍ह्याच्या दांडेली तालुक्‍यातील हलामदी गावात घडली. इथे (३२ वर्षीय) महिला सावित्री व तीचा पती रवी कुमार (वय ३६) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्‍यांच्या ६ वर्षीय मुलगा विनोदला बोलण्यात आणि ऐकण्यात काही अडचण होती. तो सर्वसाधारण मुलांप्रमाणे बोलू अथवा ऐकू शकत नव्हता. यावरून पती-पत्‍नीमध्ये वरचेवर वादाचे प्रसंग उद्भवत होते.
सावित्री आणि रवी यांच्यामध्ये मुलावरून शनिवारी वाद झाला. या रागतून सावित्रीने आपल्‍या ६ वर्षांचा मुलगा विनोदला रात्री ९ वाजता नाल्‍यात फेकून दिले. जो नाला पुढे काली नदीला जावून मिळतो. ज्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर मगरी आहेत. या घटनेच्या माहितीनंतर शोध पथक आणि अग्‍निशमन यंत्रणा घटनास्‍थळी दाखल झाली. त्‍यांनी या नाल्‍यात शोध मोहिम सुरू केली. मात्र रात्रीच्या काळोखात मुलाला शोधणे कठीण जात होते.
दुसऱ्या दिवशी रविवारी शोध पथकाने मगरीच्या जबड्यातून मुलाचा मृतदेह मिळवला. मगरीने त्‍या मुलाच्या हाताचा काही भाग खाल्‍लेला होता. शरीरावर गंभीर जखमा आणि कापल्‍याचे व्रण दिसत होते. या प्रकरणी पती-पत्‍नीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
महिलेचे म्‍हणणे होते की, या प्रकाराला माझा पतीच जबाबदार आहे. तो नेहमी म्‍हणायचा की, मुलाला मरू दे. तो फक्‍त खातच असतो. जर माझा पती असेच बोलत राहिला असता तर माझ्या मुलाला किती अत्‍याचार सहन करावा लागला असता. मी माझे दु:ख कोणाला सांगू.
हेही वाचा : 

Weather Update ! पावसाची सुरुवात विदर्भ, मराठवाड्यातून; पुणे मात्र तापलेलेच

अमेठीतील काँग्रेस कार्यालयावर हल्‍ला, वाहनांची तोडफोड

…तरीही कसाब फासावर गेलाच असता : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार