जय शहांमुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त : अर्जुन रणतुंगा

जय शहांमुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त : अर्जुन रणतुंगा

कोलंबो, वृत्तसंस्था : बीसीसीआय सचिव जय शहा हेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत असून बोर्ड उद्ध्वस्त होण्यामागे त्यांचाच हात आहे, असा गंभीर आरोप श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी केला आहे. राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे कारण देत आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त केले आहे, तसेच बोर्डाचे सदस्यत्व देखील काढून घेण्यात आले आहे. (World Cup 2023)
वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. भारताकडून दारुण पराभव झाल्यानंतर क्रिकेट बोर्डाविरोधात श्रीलंकेत आंदोलन पेटले. विविध ठिकाणी निदर्शने अन् बोर्ड बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले. याला जय शहा जबाबदार असल्याचे अर्जुन रणतुंगा यांनी म्हटले आहे. (World Cup 2023)
हेही वाचा…

World Cup Semi-finals Umpires : भारत-न्यूझीलंड सामन्यात अंपायरिंग कोण करणार? जाणून घ्या..
Virender Sehwag ICC Hall of Fame | ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरसह वीरेंद्र सेहवागला ICC चा मोठा सन्मान, ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

The post जय शहांमुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त : अर्जुन रणतुंगा appeared first on पुढारी.

कोलंबो, वृत्तसंस्था : बीसीसीआय सचिव जय शहा हेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड चालवत असून बोर्ड उद्ध्वस्त होण्यामागे त्यांचाच हात आहे, असा गंभीर आरोप श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी केला आहे. राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे कारण देत आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट बोर्ड बरखास्त केले आहे, तसेच बोर्डाचे सदस्यत्व देखील काढून घेण्यात आले आहे. (World Cup 2023) वन …

The post जय शहांमुळेच श्रीलंका क्रिकेट बोर्ड उद्ध्वस्त : अर्जुन रणतुंगा appeared first on पुढारी.

Go to Source