छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या गच्छंतीचे काऊंटडाऊन सुरू : पंतप्रधान मोदी

छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या गच्छंतीचे काऊंटडाऊन सुरू : पंतप्रधान मोदी

मुंगेली/महासमुंद (छत्तीसगड) : छत्तीसगडमधून काँग्रेसचे सरकार पायउतार होण्याचे काऊंटडाऊन आता सुरू झालेले आहे. 3 डिसेंबर रोजी भाजपचे सरकार या राज्यात स्थापन होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला.
मुंगेली तसेच महासमुंद येथे झालेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभांतून ते बोलत होते.
काँग्रेस हा सत्तेसाठी सौदेबाजी करणारा पक्ष आहे. काँग्रेसमधील समर्पित नेते आता एका कोपर्‍यात जाऊन बसलेले आहेत, रुसलेले आहेत, असेही मोदी म्हणाले. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा अडीच-अडीच वर्षांचा सौदा ठरला होता. पहिल्या अडीच वर्षांतच मुख्यमंत्र्यांनी इतकी लूट केली आणि इतका पैसा उभा केला, की अडीच वर्ष संपायला येताच दिल्लीश्वरांसाठी तिजोरीचे दारच खुले केले. नवा सौदा होताच जुना सौदा मागे पडला आणि हेच मुख्यमंत्री म्हणून पुढेही कायम राहिले. हेच पैसे कमविणार, हेच उधळणार तर जनतेसाठी काही करायला पैसे कुठून आणणार, असा माझा साधासरळ प्रश्न आहे, असे मोदींनी सांगितले.
508 कोटींत मुख्यमंत्र्यांचा वाटा किती; मोदींचा सवाल
महादेव सट्टा अ‍ॅपमध्ये 508 कोटींचे वाटप झाले. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय तुरुंगात आहेत. या 508 कोटींत मुख्यमंत्र्यांचा वाटा किती होता, तेही काँग्रेसच्या आकडेमोड तज्ज्ञांनी आता जनतेला सांगूनच टाकावे, असे आव्हान मोदींनी दिले.
The post छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या गच्छंतीचे काऊंटडाऊन सुरू : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.

मुंगेली/महासमुंद (छत्तीसगड) : छत्तीसगडमधून काँग्रेसचे सरकार पायउतार होण्याचे काऊंटडाऊन आता सुरू झालेले आहे. 3 डिसेंबर रोजी भाजपचे सरकार या राज्यात स्थापन होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केला. मुंगेली तसेच महासमुंद येथे झालेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभांतून ते बोलत होते. काँग्रेस हा सत्तेसाठी सौदेबाजी करणारा पक्ष आहे. काँग्रेसमधील समर्पित नेते आता एका …

The post छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या गच्छंतीचे काऊंटडाऊन सुरू : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.

Go to Source