मोठी बातमी : PM मोदी, राहुल गांधींविरोधातील तक्रारींची ECने घेतली दखल

मोठी बातमी : PM मोदी, राहुल गांधींविरोधातील तक्रारींची ECने घेतली दखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्‍यावरील आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी दाखल तक्रारींची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेसने परस्‍परविरोधात धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने २९ एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे की, राजकीय क्षांच्‍या स्टार प्रचारकांवर राज्य करण्यासाठी पहिली पायरी म्हणून पक्षाध्यक्षांना जबाबदार धरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहिता भंगाच्‍या आरोप प्रकरणी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावण्‍यात आली आहे. याप्रकरणी २९ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे.
राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या लोकांच्या प्रचारातील भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात, असेही निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे.

ECI takes cognizance of alleged MCC violations by Prime Minister Narendra Modi and Congress leader Rahul Gandhi. Both BJP and INC had raised allegations of causing hatred and divide based on religion, caste, community, or language.
ECI seeks response by 11 am on 29th April. pic.twitter.com/XbNtrI1a1s
— ANI (@ANI) April 25, 2024

 

Go to Source