अरुणाचल प्रदेशात भूस्खलन! चीन सीमेला जोडणारा महामार्ग वाहून गेला (पाहा व्हिडिओ)

अरुणाचल प्रदेशात भूस्खलन! चीन सीमेला जोडणारा महामार्ग वाहून गेला (पाहा व्हिडिओ)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) गुरुवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या महामार्गाचा काही भाग वाहून गेला. हा दिबांग व्हॅली जिल्ह्याला संपूर्ण भारताशी जोडणारा एकमेव मार्ग होता. प्राथमिक माहितीनुसार, या भूस्खलनामुळे हुनली आणि अनिनी दरम्यानच्या रोईंग अनिनी महामार्गालगतच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दिबांग खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे झालेल्या भूस्खलनामुळे हुनली आणि अनिनी दरम्यानचा महामार्ग ३१३ चा मोठा भाग वाहून गेला आहे. महामार्ग मोकळा करण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. हुनली आणि अनिनी दरम्यानच्या महामार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे लोकांची गैरसोय झाली आहे. हा रस्ता दिबांग खोऱ्याला देशाच्या इतर भागाशी जोडणारा आहे. या भागाशी लवकरात लवकर संपर्क पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.
संततधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. दिबांग खोऱ्यातील रहिवाशांसाठी जारी केलेल्या सूचनेमध्ये जिल्हा प्रशासनाने सांगितले की, रोईंग अनिनी महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाला किमान तीन दिवस ​​लागतील.

Disturbed to learn the inconvenience being caused to commuters due to the extensive damage to the highway between Hunli and Anini. Instructions have been issued to restore the connectivity at the earliest as this road connects Dibang Valley to the rest of the country.@PMOIndia https://t.co/xwiOu7yrJB
— Pema Khandu པདྨ་མཁའ་འགྲོ་། (Modi Ka Parivar) (@PemaKhanduBJP) April 25, 2024

हे ही वाचा :

देशातील आजवरचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट तयार; चाचणी यशस्वी
केजरीवाल अटक प्रकरणी ‘ईडी’चे प्रतिज्ञापत्र, “नेता आणि गुन्‍हेगार…”

Go to Source