डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा प्राचार्य कणबरकर पुरस्काराने आज सन्मान

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा प्राचार्य कणबरकर पुरस्काराने आज सन्मान

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा गुरुवारी (दि. 25) सन्मान होणार आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबईचे अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात दुपारी चार वाजता कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती, तसेच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचे हे पुरस्कारचे 9 वे वर्ष आहे. पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत डॉ. जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.