अफगाण फलंदाजच्‍या ‘दयाळूपणा’ने थरुर भारावले, “कोणत्‍याही शतकी खेळीपेक्षा…”

अफगाण फलंदाजच्‍या ‘दयाळूपणा’ने थरुर भारावले, “कोणत्‍याही शतकी खेळीपेक्षा…”


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात दिवाळी सणाचा जल्‍लोष सुरु आहे. दिवाळी सणात विश्‍वचषक स्‍पर्धेची धुम सुरु आहे. दरम्‍यान, अफगाणिस्‍तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz)  हा दिवाळीनिमित्त अहमदाबादमध्‍ये रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना पैसे वाटताना दिसला. त्यांच्‍या कृतीने भारावलेले काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोशल मीडियावर पोस्‍ट करत गुरबाजचे विशेष कौतूक केले आहे. तसेस त्‍यांनी क्रिकेटमधील शतकी खेळीपेक्षाही हे दयाळू कृत्‍य मोठे असल्‍याचे नमूद केले आहे.
दिवाळीच्‍या पहाटे तीन वाजता गुरबाज याने अहमदाबादमध्ये रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना पैसे वाटण्यास सुरुवात केली. एका स्थानिक रहिवाशाने याचा व्‍हिडिओ शूट केला. तो सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. यावर शशी थरूर यांनीसोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्‍यांनी लिहिले आहे की, ‘अफगाण फलंदाजाने शेवटच्या सामन्यानंतर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांसाठी केलेले दयाळू कृत्य. त्याने आतापर्यंत केलेल्या कोणत्याही शतकापेक्षा हे खूप जास्त आहे. त्याची कारकीर्द त्याच्या हृदयाप्रमाणे दीर्घकाळ बहरत राहो.’ (Rahmanullah Gurbaz)
गुरुबाज हा अहमदाबाद येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांकडे पैसे ठेवत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आयपीएल टीम केकेआरने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी गुजबाजला प्रेमाने हाक मारली. केकेआरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपानंतर भूकंपग्रस्तांसाठी पैसे गोळा करण्यापासून ते परदेशी भूमीवर अशा दयाळू कृत्यांपर्यंत, तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देता.”
यंदाच्‍या एकदिवसीय क्रिकेट विश्‍वचषक स्‍पर्धेतील अफगाणिस्‍तान संघाचे आव्‍हान संपुष्‍टात आले आहे. नवख्‍या अफगाणची कामगिरी लक्षवेधी ठरली; परंतु हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकला नाही. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा पराभव करून ऑस्ट्रेलियासारख्या संघाला कडवे आव्हान दिले होते.

Just amazing act of kindness by Afghan batsman Rahmatullah Gurbaz to pavement dwellers in Ahmedabad after his last match. Far greater than any century he might score — and may he score many! Long may his career thrive, along with his heart…. pic.twitter.com/hgeBubHNzv
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 12, 2023

हेही वाचा :

गुरबाजने केली गरिबांची दिवाळी गोड
Diwali 2023 : दिवाळीत सोन्याची विक्रमी खरेदी; राज्यात ७५० टन सोन्याची उलाढाल

 
 
The post अफगाण फलंदाजच्‍या ‘दयाळूपणा’ने थरुर भारावले, “कोणत्‍याही शतकी खेळीपेक्षा…” appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात दिवाळी सणाचा जल्‍लोष सुरु आहे. दिवाळी सणात विश्‍वचषक स्‍पर्धेची धुम सुरु आहे. दरम्‍यान, अफगाणिस्‍तानचा फलंदाज रहमानउल्ला गुरबाज (Rahmanullah Gurbaz)  हा दिवाळीनिमित्त अहमदाबादमध्‍ये रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना पैसे वाटताना दिसला. त्यांच्‍या कृतीने भारावलेले काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोशल मीडियावर पोस्‍ट करत गुरबाजचे विशेष कौतूक केले आहे. तसेस त्‍यांनी …

The post अफगाण फलंदाजच्‍या ‘दयाळूपणा’ने थरुर भारावले, “कोणत्‍याही शतकी खेळीपेक्षा…” appeared first on पुढारी.

Go to Source