जळगावसाठी 5 उमेदवारांनी 10 तर रावेरसाठी 8 उमेदवारांनी केले 11 अर्ज 

जळगावसाठी 5 उमेदवारांनी 10 तर रावेरसाठी 8 उमेदवारांनी केले 11 अर्ज 

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जळगाव लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी 21 अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 8 उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले.
लोकसभेच्या सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करण पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात एकूण 16 उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.
दि. 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 16 अर्ज दिवसभरात दाखल झाले.
हेही वाचा –

Jalgaon Crime | नशिराबाद टोलनाक्याजवळ गुटखा व तंबाखूसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
China Flood | दक्षिण चीनमध्ये पावसाचा हाहाकार; ४ ठार, हजारोंना सुरक्षितस्थळी हलवले