बाप रे ! हडपसरचा पारा 43.5 अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या

बाप रे ! हडपसरचा पारा 43.5 अंशांवर; शहरात उन्हाच्या झळा वाढल्या

पुणे : शहरातील कमाल तापमानाचे सर्व रेकॉर्ड गुरुवारी मोडत हडपसरने बाजी मारली. गुरुवारी हडपसर भागाचे कमाल तापमान राज्यात सर्वोच्च 43.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. उन्हाची तीव्रता इतकी होती की, पुणेकर दिवसभर घामाने चिंब झाले. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय मंडळीदेखील उन्हाच्या कडाक्यात भाजून निघाली. रात्री 12 वाजता पुण्याचे किमान तापमान 29 अंश सेल्सिअसवर गेले होते. चार-पाच दिवसांपासून ते 12.8 वर होते. किमान तापमानात वाढ झाल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हे हंगामातील सर्वाधिक तापमान आहे.
पुणे शहराचे सर्वाधिक तापमान एप्रिलमध्ये 42.8 इतके आहे. मात्र, गुरुवारी हडपसरचे कमाल तापमान 43.5, वडगाव शेरी 43.1, कोरेगाव पार्क 43 अंशांवर पोहचले होते. तर शिवाजीनगरचा पारा 41 अंशांवर होता. बाकी सर्व भागाचे तापमान 42 अंशांवर गेले होते. त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिक अक्षरश: उन्हाच्या तडाख्यात भाजून निघाले. सामान्य नागरिकांसह राजकीय नेते व पदाधिका-यांची देखील चांगलीच होरपळ झाली.
हेही वाचा

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पहिल्या दोन तासात 7.44 टक्के मतदान
पुणे पुन्हा हादरलं! येरवड्यातील अग्रसेन शाळेसमोर तरुणावर गोळीबार
नाशिकमध्ये चार दिवसांत पाऱ्याची दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी, पारा ४०.७ अंशांवर