अखेर ए.वाय. यांचे ठरले: छ. शाहू महाराजांना देणार पाठिंबा

अखेर ए.वाय. यांचे ठरले: छ. शाहू महाराजांना देणार पाठिंबा

आशिष. ल. पाटील

गुडाळ : मागील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील भूमिका अखेर स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना उघड समर्थन देण्याचा निर्णय त्यांनी आज (दि.१२) घेतला आहे. kolhapur Lok Sabha
रविवारी (दि.१४) सकाळी राधानगरी- भुदरगडमधील समर्थकांसह महारॅली काढून कोल्हापुरात नवीन राजवाड्यात छ. शाहूंची भेट घेऊन आपण त्यांना पाठिंबा देणार आहेत. मात्र, मी राष्ट्रवादी सोडलेली नाही. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी छ. शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचे ए.वाय यांनी ‘दै. Bharat Live News Media’च्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. kolhapur Lok Sabha
महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे खास मित्र असलेले ए. वाय. पाटील लोकसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता होती. गेल्या आठवड्यात ए. वाय. यांचे व्याही आणि भाजप नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर, अरुणराव इंगवले, बाबा देसाई, प्रताप कोंडेकर यांनी बिद्री येथे ए. वाय. यांची भेट घेऊन महायुतीमध्ये सक्रिय होण्याची विनंती केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी भूमिका जाहीर करेन, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे सर्वेसर्वा मंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी असलेले मेव्हणे माजी आमदार के. पी. पाटील यांनाच झुकते माप देत असल्याचे ए. वाय यांचे नेहमीचे दुखणे होते. आपला गट फोडण्यासाठी के.पीं.ना त्यांचीच फूस असल्याचा आरोप त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात केला होता.
त्यामुळे महायुतीमध्ये नाराज असलेल्या ए.वाय. यांना महाविकास आघाडीच्या तंबूत आणण्यास राष्ट्रीय काँग्रेसचे आ. पी. एन. पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शाहुवाडीच्या रणवीरसिंह गायकवाड आणि ए. वाय. पाटील या जिल्हा बँकेतील राष्ट्रवादीच्या दोन संचालकांनी राष्ट्रवादीत राहूनच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
रविवारी राधानगरी -भुदरगडमधून काढण्यात येणाऱ्या ए. वाय. यांच्या रॅलीच्या स्वागतासाठी नवीन राजवाड्यावर आ. पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील हेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर : दूधगंगा नदीचे पात्र चौथ्यांदा कोरडे! दत्तवाड परिसरात पाणीप्रश्न गंभीर
Kolhapur Lok Sabha : लोकसभेबाबत ए. वाय. पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात
Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

Latest Marathi News अखेर ए.वाय. यांचे ठरले: छ. शाहू महाराजांना देणार पाठिंबा Brought to You By : Bharat Live News Media.