छत्रपती संभाजीनगर : भरधाव कंटेनरची दिशादर्शक कमानीला धडक

छत्रपती संभाजीनगर : भरधाव कंटेनरची दिशादर्शक कमानीला धडक

गंगापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे आज (दि.१२) कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरची दिशादर्शक कमानीला जोरदार धडक बसली. कंटेनरच्या बाजूने जाणाऱ्या कारवर ही कमान पडल्याने कंटेवरसह कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून गंगापूर मार्गे कर्नाटककडे कंटेनर (जी. जे. ०१ सी व्ही ५५९९) महाकाय यंत्र घेवून जात होता. भेंडाळा फाटा येथील गंगापूर मार्गावर या कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनरची दिशादर्शक कमानीला जोरदार धडक बसली. कंटेनरच्या बाजूने जाणाऱ्या कारवर ही कमान आपटल्याने कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, ट्रॅफिक हवालदार संदीप राठोड, श्रीकांत बर्डे, रमेश जारवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर रस्त्यात पडलेली कमान क्रेनच्या सहाय्याने बाजूला करीत पोलिसांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.
हेही वाचा :

सांगली: विटा येथील गादी कारखान्याला भीषण आग
जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस, अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार
दुर्दैवी ! कुलर सुरु करताना विजेचा धक्का बसल्याने १२ वर्षीय बालिकेचा मृत्यू, जळगावात हळहळ

Latest Marathi News छत्रपती संभाजीनगर : भरधाव कंटेनरची दिशादर्शक कमानीला धडक Brought to You By : Bharat Live News Media.