ठाणे : येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा; २० लाखांचे दागिने लंपास

ठाणे : येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा; २० लाखांचे दागिने लंपास

ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाण्यातील येऊर हिल्स येथील सुधीर बाळूभाय मेहता (५०) यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर गुरूवारी (दि.४) पहाटे दरोडा पडला. सात जणांच्या टोळीने दरोडा टाकून प्लॅटिनम, डायमंड व सोन्याचे १९ लाख ९० हजाराचे दागिने लुटून नेले. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवसायाने बिल्डर असलेल्या सुधीर मेहता यांचा ठाण्यातील येऊर हिल्स येथे पुष्पा फार्महाऊस आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटेच्या सुमारास सात दरोडेखोरांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश केला. यावेळी फार्महाऊसमध्ये सुधीर मेहता व त्यांचा मित्र विनय नायर असे दोघेजण झोपले होते. दरोडेखोरांनी त्यांच्याकडील गन, सुरा इत्यादी हत्यारांचा धाक दाखवून, तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत एकूण १९ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने लुटून नेले. दरोडेखोरांनी मंकी कॅप व हातात ग्लोव्हज घातलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वर्तकनगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथकाकडून या दरोड्याप्रकरणी तपास सुरू आहे.
हेही वाचा :

कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ एकाचा पाठलाग करून निर्घृण खून
Jalgaon Crime News | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल
आयपीएल सामन्यावर बेटींग लावणाऱ्यास नाशिक पोलिसांकडून बेड्या

Latest Marathi News ठाणे : येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा; २० लाखांचे दागिने लंपास Brought to You By : Bharat Live News Media.