Opening Bell : सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीनेही गाठली 22,600 ची पातळी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्थिक वर्ष २०२४-२५ पहिल्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात एक नवीन विक्रम झाला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने तेजी अनुभवली. आज (दि.४ एप्रिल) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा विक्रमी पातळीवर व्यवहार करताना दिसले. या काळात सेन्सेक्सने 500 अंकांची उसळी घेतली आणि 74,400 चा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही … The post Opening Bell : सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीनेही गाठली 22,600 ची पातळी appeared first on पुढारी.

Opening Bell : सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीनेही गाठली 22,600 ची पातळी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : आर्थिक वर्ष २०२४-२५ पहिल्या साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात एक नवीन विक्रम झाला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने तेजी अनुभवली. आज (दि.४ एप्रिल) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा विक्रमी पातळीवर व्यवहार करताना दिसले. या काळात सेन्सेक्सने 500 अंकांची उसळी घेतली आणि 74,400 चा टप्पा पार केला. तर निफ्टीनेही प्रथमच 22,600 ची पातळी गाठली. दरम्‍यान, बुधवार, ३ एप्रिलला सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 वर बंद झाला होता.
आज BSE सेन्सेक्स ४९७.०६ अंकांच्या म्हणजेच ०.६७ टक्क्यांच्या वाढीसह ७४,३७३.८८ या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 144.70 अंकांच्या किंवा 0.64 टक्क्यांच्या वाढीसह 22,579.35 चा नवा उच्चांक गाठला. गेल्या दोन सत्रांत दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते.
धातू आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजारात उत्‍साह
मेटल आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला पाठिंबा मिळाला. निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक टॉप गेनर म्हणून व्यवहार करताना दिसली, तर इंडसइंड बँक टॉप लूसर म्हणून व्यवहार करताना दिसली. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि ॲक्सिस बँकेचे २८ शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. तर इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक लाल निशापारवर व्यवसाय करताना दिसले. गुरुवारी NSE निफ्टीच्या 50 शेअर्समधील 46 शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.
१ एप्रिललाही बाजाराने गाठली हाेती उच्‍चांकी पातळी
यापूर्वी 1 एप्रिल रोजी सेन्सेक्सने 74,254.62 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. यानंतर तो 74,014 वर बंद झाला. त्याच दिवशी निफ्टीने 22,462 ही सर्वोच्च पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या 50 शेअर्सच्या सेन्सेक्सने दिवसभरात 22,529.95 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती.
Latest Marathi News Opening Bell : सेन्सेक्स 500 अंकांनी वधारला, निफ्टीनेही गाठली 22,600 ची पातळी Brought to You By : Bharat Live News Media.