गोदामाला लागलेल्या आगीत साहित्य खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

गोदामाला लागलेल्या आगीत साहित्य खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

पौड रोड : Bharat Live News Media वृत्तसेवा : पौड रोडवरील तुळजाभवानी मंदिर टेकडीवर मंडपाच्या साहित्याला बुधवारी (दि. 3) दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग एवढी मोठी होती की लांबूनच धुराचे मोठे लोट दिसून येत होते. त्यामुळे या आगीची चर्चा सर्वत्र पसरली. या गोडाऊनच्या साहित्यामध्ये सिलिंडरसुद्धा होते आणि या सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.
अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच कोथरूड, एरवंडणा, सिंहगड रोड असे अग्निशमन दलाचे पाच बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून ही आग विझवली, असे एरवंडणा स्टेशनचे अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले. या आगीमुळे जय भवानी तुळजा भवानी मंदिर परिसरातील टेकडीवरील अधिकृत गोदामांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. असे अनधिकृत गोदामांकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
हेही वाचा

Loksabha election 2024 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कडक उन्हाळ्यात गारेगार बर्फ टाकलेल्या शितपेयाचा आनंद घेताय, तर सावधान!
Pune : आचारसंहितेचा भंग न होणाऱ्या फ्लेक्सलाच परवानगी..

Latest Marathi News गोदामाला लागलेल्या आगीत साहित्य खाक; सुदैवाने जीवितहानी नाही Brought to You By : Bharat Live News Media.