श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्ध ‘डंका’, WTC रँकिंगमध्‍ये पाकिस्‍तानला झटका

श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्ध ‘डंका’, WTC रँकिंगमध्‍ये पाकिस्‍तानला झटका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : बांगलादेशविरुद्धच्‍या दाेन सामन्‍यांच्‍या कसाेटी मालिकेत आज ( दि. ३ एप्रिल) श्रीलंकेने 2-0 असा विजय मिळवला.  श्रीलंकेने सलग दाेन सामन्‍यात विजय मिळवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ( Wtc Points Table ) मोठा बदल केला आहे. यामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले आहे,  भारताचे अग्रस्‍थान कायम आहे.
पाकिस्‍तानची घसरण, श्रीलंका चौथ्‍या स्‍थानी
श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी १९२ धावांनी जिंकला. याआधी संघाने पहिला सामना 328 धावांनी जिंकला होता. या मालिका विजयामुळे श्रीलंका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी संघ ३३.३३ गुणांसह सहाव्या क्रमांकावर होता. दुसऱ्या सामन्यातील विजयासह संघाने पाकिस्तानला पिछाडीवर टाकले आहे. श्रीलंकेची गुणांची टक्केवारी 50 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, पाकिस्तान 36.66 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेने चारपैकी दोन सामने जिंकले. त्याचवेळी पाकिस्तानने पाच सामने खेळले त्‍यातील केवळ दोन सामने जिंकले आहेत.

Sri Lanka claim 12 #WTC25 points and complete a 2-0 Test series victory over Bangladesh away from home!#BANvSL 📝: https://t.co/zdMpYHlTWg pic.twitter.com/luSTxvcw2S
— ICC (@ICC) April 3, 2024

Wtc Points Table : भारताचे अव्वल स्‍थान कायम
श्रीलंकेच्या विजयामुळे भारताचे नुकसान झालेले नाही. नऊ सामन्यांत सहा विजयांसह टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमध्‍ये भारत अव्वल स्थानावर कायम आहे. टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी ६८.५१ आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे या संघाची गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. न्यूझीलंड सहा सामन्यांमध्ये तीन विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याची गुणांची टक्केवारी ५० आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 25 आहे.
टेस्ट चॅम्पियनशिप रँकिंगमधील प्रथम तीन संघ
   देश               गुण
भारत            ६८.५१
ऑस्ट्रेलिया     ६२.५०
न्‍यूझीलंड          ५०
 
 
The post श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्ध ‘डंका’, WTC रँकिंगमध्‍ये पाकिस्‍तानला झटका appeared first on Bharat Live News Media.