अँजलो मॅथ्यूज : क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या ‘या’ आहेत 10 पद्धती

अँजलो मॅथ्यूज : क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या ‘या’ आहेत 10 पद्धती

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना ‘टाईम आऊट’मुळे गाजला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात या पद्धतीनं बाद झालेला मॅथ्यूज हा पहिलाच फलंदाज आहे.

 

1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला. त्यानंतर वन-डे आणि टी20 क्रिकेट सुरू झाले. या संपूर्ण कालावधीत ‘टाईम आऊट’ चा वापर कधी झाला नव्हता.

 

अँजलो मॅथ्यूजच्या प्रकरणामुळे ‘टाईम आऊट’ची सर्वत्र चर्चा झाली. पण तुम्हाला क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 10 पद्धती माहिती आहेत का?

 

या दहा पद्धतींपैकी पाच प्रकार सर्वांना माहिती आहेत. पण, उर्वरित पाच पद्धतीनं फलंदाज बाद होण्याचा प्रकार सहसा घडत नाही.

 

1) क्लीन बोल्ड : गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाचा बचाव भेदून थेट स्टम्पवर आदळतो आणि स्टम्प पडतात. त्याला क्लीन बोल्ड म्हणतात.

 

2) झेलबाद : फलंदाजानं हवेत मारलेला बॉल क्षेत्ररक्षक पकडतो. त्याला कॅच आऊट किंवा झेलबाद असं म्हंटलं जातं.

 

3) लेग बिफोर विकेट (LBW) : गोलंदाजाचा स्टम्पच्या दिशेनं सरळ येणारा चेंडू हा फलंदाजाच्या बॅटला न लागता त्याच्या पायाला लागतो, त्याला लेग बिफोर विकेट म्हणजे LBW असे म्हणतात.

 

4) स्टम्प्ड आऊट : फलंदाज बॉल खेळण्यासाठी क्रिझ सोडून पुढे जातो. पण, बॉल हा बॅटला न लागतो विकेटकिपरच्या हातात विसावतो. त्यावेळी विकेटकिपर फलंदाज क्रिझमध्ये परत येण्याच्या आधीच चपळाईनं बॉलनं स्टम्प उडवतो त्याला स्टम्पड आऊट असं म्हंटलं जातं.

 

5) रन आऊट : फलंदाजानं धाव पूर्ण करण्याच्या आधीच क्षेत्ररक्षकानं बॉल स्टम्पवर मारल्यास त्याला रन आऊट दिलं जातं.

6) मंकडींग : हा रन आऊटचाच एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाजानं बॉल टाकण्याच्या आधीच नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजानं क्रिझ सोडले असेल तर गोलंदाजाला बॉल स्टम्पला लावून फलंदाजाला बाद करता येते.

 

यावेळी गोलंदाजाला नॉन स्ट्रायकरला रन-आऊट करण्यात अपयश आले तर अंपायर तो ‘डेड बॉल’ घोषित करतात.

 

माजी भारतीय खेळाडू विनू मंकड यांच्या नावावरून हा शब्द तयार झाला आहे.

 

भारतीय क्रिकेट संघ 1947 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी मंकड यांनी या पद्धतीनं ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला सर्वप्रथम बाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी हा शब्द तयार केला.

 

या पद्धतीनं गोलंदाजानं नॉन स्ट्रायकरला बाद करणे हे खेळ भावनेला धरुन नाही, अशी नेहमी टीका करण्यात आली आहे.

 

काही प्रसंगात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधारानं अपिल मागं घेत बाद फलंदाजाला पुढं खेळू देण्याचे औदार्य दाखवले आहे.

 

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडचा इश सोढी या पद्धतीनं बाद झाला. पण, बांगलादेशचा त्या सामन्यातील कर्णधार लिटन दासनं सोढी विरुद्धचं अपिल मागं घेतलं होतं.

 

7) हिट विकेट : फलंदाजी करताना फलंदाजी बॅट किंवा शरीराचा कोणता भाग स्टम्पला लागून बेल्स किंवा स्टम्प खाली पडले तर त्याला हिट विकेट घोषित केले जाते.

 

8) डबल हिट : फलंदाजानं बॅटनं बॉल दोन वेळा टोलावल्याल त्याला डबल हिट आऊट दिलं जातं.

 

माल्टा विरुद्ध रोमानिया यांच्या ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या टी 20 सामन्यात माल्टचा सलामीवीर फनयान मुगल या पद्धतीनं बाद झाला होता.

 

9) ऑबस्ट्राक्टिंग द फिल्ड : एखादा फलंदाज क्षेत्ररक्षणात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असेल तर त्याला या पद्धतीनं बाद दिले जाते.

 

10) टाईम आऊट : एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाज निर्धारित वेळेत मैदानात आला नाही तर त्याला टाईम आऊट दिले जाते.

 

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील नियमानुसार एखादा फलंदाज बाद किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील फलंदाजानं 2 मिनिटाच्या आत बॅटिंगसाठी सज्ज असलं पाहिजे.

 

Published By- Priya Dixit 

 

 

 

आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना ‘टाईम आऊट’मुळे गाजला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात या पद्धतीनं बाद झालेला मॅथ्यूज हा पहिलाच फलंदाज आहे.

1877 साली पहिला कसोटी सामना खेळला गेला. त्यानंतर …

Go to Source