धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाणे लोकसभेसाठी धन्युष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकाराची ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केला आहे. दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने … The post धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक appeared first on पुढारी.

धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  ठाणे लोकसभेसाठी धन्युष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकाराची ऑफर आपल्याला नव्हती असा खुलासा माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी केला आहे. दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूल मध्ये पोहण्याची गरज नाही असे वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचालवल्या आहेत.
संबंधित बातम्या 

निवडणूकविषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजिल’ चा दिलासा..
Wtc Points Table : बांगलादेशविरुद्धच्‍या कसाेटी मालिकेत श्रीलंकेचा विजय, WTC रँकिंगमध्‍ये पाकिस्‍तानला झटका
Lok Sabha elections 2024 : ठाकरे गटाचे ८ आमदार आमच्या संपर्कात; उदय सामंत यांचा दावा

ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही. त्यामुळे या दोन्ही लोकसभा मतदार संघाचा सस्पेन्स अद्याप कायम असल्याने या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे.
तर भाजप कडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यांची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. नाईक यांच्या या ‘ठाणे’वारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिले आहेत.
Latest Marathi News धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची कधीही ऑफर नव्हती : संजीव नाईक Brought to You By : Bharat Live News Media.