Loksabha election 2024 : बारामती मतदारसंघात मतदानाबाबत शपथ..

Loksabha election 2024 : बारामती मतदारसंघात मतदानाबाबत शपथ..

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, खडकवासला, दौंड, भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतून मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासह निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
इंदापूर येथे मतदार जागृती मंचच्या वतीने क्यूआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधण्याची माहिती देण्याकरिता जिल्हा परिषद शाळा इंदापूर क्रमांक 1 व 2 येथे शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी विस्तार अधिकार्‍यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. मतदार व त्यांच्या परिचयातील शिक्षक व पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले. बारामती विधानसभा मतदारसंघात पियाजियो कंपनीतील सुमारे 300 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. या वेळी निवडणुकीत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात वडगाव बुद्रुक येथे महिला बचत गटाच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. या वेळी महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. दौंड विधानसभा मतदारसंघात यवत आणि दहिटणे येथे अंगणवाडीस्तरावर गृहभेटीचे आयोजन केले गेले. या वेळी महिला मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदानाचे आवाहन करण्यात आले. अंगणवाडीसेविका आणि महिला मतदारांनी मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेतली. भोर विधानसभा मतदारसंघात अरिहंत महाविद्यालय बावधन येथे मतदार जनजागृती करण्यात आली. या वेळी मुळशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, शिक्षक आणि 92 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेसोबतच मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.
अनंतराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी पिरंगुट बसस्थानक चौक येथे मतदार जागृती फेरीचे आयोजन केले. या वेळी सुमारे 150 पेक्षा अधिक विद्यार्थी-पालक उपस्थित होते. माळवाडी (वाल्हे) येथे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. परिसरातील इतरही पात्र नागरिकांना मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
हेही वाचा

Loksabha election 2024 : कडक तापमानाचा प्रचाराला फटका
ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला; कारखान्याचे तोडणीचे नियोजन कोलमडले
लायगुडे दवाखान्याच्या खासगीकरणाचा घाट : दोन संस्थांच्या निविदा ठरल्या पात्र

Latest Marathi News Loksabha election 2024 : बारामती मतदारसंघात मतदानाबाबत शपथ.. Brought to You By : Bharat Live News Media.