महायुतीसोबतच ‘मविआ’ची ताकद

हातकणंगले : हातकणंगले लोकसभेची निवडणूक बहुरंगी होण्याचे चित्र स्पष्ट झाल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणे बदलत आहेत. या आधी खा. धैर्यशील माने विरुद्ध माजी खा. राजू शेट्टी अशी दुरंगी लढतीची चर्चा मतदारसंघात असतानाच वंचित बहुजन आघाडीने जि. प. माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान … The post महायुतीसोबतच ‘मविआ’ची ताकद appeared first on पुढारी.

महायुतीसोबतच ‘मविआ’ची ताकद

बाबुराव जाधव

हातकणंगले : हातकणंगले लोकसभेची निवडणूक बहुरंगी होण्याचे चित्र स्पष्ट झाल्याने हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणे बदलत आहेत. या आधी खा. धैर्यशील माने विरुद्ध माजी खा. राजू शेट्टी अशी दुरंगी लढतीची चर्चा मतदारसंघात असतानाच वंचित बहुजन आघाडीने जि. प. माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे, माजी आ. सुजित मिणचेकर, माजी आ. राजीव किसन आवळे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत आहेत; परंतु अद्याप आघाडीचा उमेदवार न ठरल्यामुळे संभ्रमावस्था आहे. त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये निर्णायक ठरू शकते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचेही हातकणंगले मतदारसंघावर प्रभुत्व आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य असल्याने निश्चितच त्यांची ताकद महायुतीच्या उमेदवाराला बळ देणारी ठरणार आहे. त्याचबरोबर माजी आ. महादेवराव महाडिक यांना मानणारा मोठा गट हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याने भाजप सहयोगी पक्षाला त्यांची ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी खा. राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यामुळे शेतकरी संघटनेचे गावागावांमध्ये असणारे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत; परंतु शेट्टींना मानणारा मोठा शेतकरीवर्ग पेठवडगाव येथील शिवाजीराव माने यांच्या जय शिवराय संघटनेमध्ये कार्यरत असल्याने याचा फटका शेट्टींना काही प्रमाणात बसू शकतो, असेही मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
कुंभोज येथील माजी जि. प. अध्यक्ष डी. सी. पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे जातीय समीकरणांच्या आधारे राजू शेट्टी यांच्या मतांमध्ये विभागणी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच हातकणंगले तालुक्यामध्ये कार्यरत असणारा भाजप बुथ कमिट्यांपासून केंद्र शासनाच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याने याचा फायदा महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांना निश्चितच होणार, अशी अटकळ बांधली जात आहे.
Latest Marathi News महायुतीसोबतच ‘मविआ’ची ताकद Brought to You By : Bharat Live News Media.