खा. मंडलिक, खा. माने यांनी घेतली आ. विनय कोरे यांची भेट
वारणानगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आमदार डॉ. विनय कोरे यांच्या माध्यमातून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी आ. कोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. लोकसभा निवडणुकीत महायुतीची रणनीती व प्रचाराची दिशा कशी असेल, या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. दोन्ही खासदारांनी वारणेत भेट दिल्याने या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
चाळीस आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भाजपशी युती करून राज्यात एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. याच काळात आ. कोरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या दोन खासदारांची शिंदे गटात समावेशाची जबाबदारी दिली होती. त्यप्रमाणे वारणेत चर्चा होऊन कमिटमेंट ठरली होती. ती मंडलिक व माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पूर्ण झाल्याचे समाधान दोन्ही खासदारांच्या चेहर्यावर दिसत होते.
Latest Marathi News खा. मंडलिक, खा. माने यांनी घेतली आ. विनय कोरे यांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.