सोलापूर : टेंभुर्णी बस स्थानकावर बहिणीच्या वास्तुशांती कार्यक्रमास आलेल्या पुण्यातील महिलेचे दागिने लंपास

सोलापूर : टेंभुर्णी बस स्थानकावर बहिणीच्या वास्तुशांती कार्यक्रमास आलेल्या पुण्यातील महिलेचे दागिने लंपास

टेंभुर्णी; Bharat Live News Media वृत्तसेवा : टेंभुर्णी बस स्थानक चोरट्यांचा अड्डा बनले असून सामान्य प्रवाशांना कोणी वाली उरला नसल्याचे सततच्या चोरीच्या घटनेवरून समोर येत आहे. टेंभुर्णी बस स्थानकात बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेच्या पर्समधून सव्वा सहा तोळ्याचे दागिने चोरीस गेले आहेत. १ एप्रिल पावणे पाच वाजताच्या सुमारास ही चोरीची खळबळजनक घटना घडली आहे.
टेंभुर्णी बस स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांचे दागिने,रोख रक्कमेची चोरी, महिला, शाळेतील मुली यांची छेडछाड, टवाळगिरी अशा घटना सतत घडत आहेत. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने पहात नाही. प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे. अशीच घटना पुण्यातील ५० वर्षीय नौकरदार महिलेच्या बाबत घडली आहे. वर्षा रविंद्र गायकवाड (वय ५० रा.सेनापती बापट मार्ग, मारणे चौक, दापोडी. ता.हवेली,जि.पुणे) येथील त्या रहिवासी आहेत. त्या पती रविंद्र यांच्या समवेत टेंभुर्णीत बहिणीच्या वास्तू शांती कार्यक्रमास आल्या होत्या.पुण्यास जाण्यासाठी टेंभुर्णी तील बहिणीच्या घरातून निघण्यापूर्वी त्यांनी दागिने पाकिटात ठेवून ते पाकीट पर्समध्ये ठेवले होते.०१ एप्रिल रोजी दुपारी ४.४५ वा. सुमारास त्या टेंभुर्णी बस स्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने त्यांना हेरून त्यांच्या पर्स मधील दागिन्यांचे पाकीट चोरी केले.बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडी असून दागिने नसल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी खाली उतरून शोधा शोध केली.
बस स्थानकात जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या पाठीमागून बसमध्ये चढत असलेल्या गुलाबी कुडता,पांढरी सलवार व तोंडास पांढरी ओढणी लावलेल्या अनोळखी महिलेने चोरी केले असल्याचे फुटेज वरून अंदाज आला आहे.ती बसमधून न जाता खाली उतरली होती.मात्र तो पर्यंत ती महिला लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाली होती.३५ ग्रॅमचे सोन्याचे गंठन,२५ ग्रॅमचे दोन पदरी मनिमंगळसूत्र,दोन ग्रॅमचे टॉप्स असे दागिने होते.टेंभुर्णी पोलिसात फिर्याद दिली असून सपोफौ विलास रणदिवे हे अधिक तपास करीत आहेत.
Latest Marathi News सोलापूर : टेंभुर्णी बस स्थानकावर बहिणीच्या वास्तुशांती कार्यक्रमास आलेल्या पुण्यातील महिलेचे दागिने लंपास Brought to You By : Bharat Live News Media.