सुनील नरेनचे झंझावाती अर्धशतक

सुनील नरेनचे झंझावाती अर्धशतक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार श्रेयसने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. आंगकृष्ण रघुवंशीला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचवेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की त्यानेही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. पंतने प्लेइंग-11 मध्येही बदल केला आहे. मुकेश कुमार जखमी झाला आहे. त्याच्या जागीअष्टपैलू सुमित कुमारला संघात स्थान मिळाले आहे. (DC vs KKR)
सुनील नरेनचे झंझावाती अर्धशतक
सुनील नरेनने 21 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक आहे. नरेनने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाला झोडपून काढले. फलंदाजीत तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. पॉवरप्लेमध्ये 88 धावा ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
कोलकाताला पहिला धक्का; सॉल्ट बाद
सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये कोलकाताचा पहिला फलंदाज बाद झाला. दिल्लीचा गोलंदाज नोर्त्झेने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर सॉल्टला स्टब्सकरवी झेलबादकरून कोलकाताला पहिला धक्का दिला. सॉल्टने आपल्या खेळीत 12 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार लगावले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, रसिक दार सलाम, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, सुमित कुमार, खलील अहमद.
इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज.

🚨 Toss 🚨@KKRiders win the toss and elect to bat against @DelhiCapitals
Follow the Match ▶️ https://t.co/SUY68b95dG #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/7ll4fGAK5O
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2024

हेही वाचा :

Shree Siddhivinayak Temple : सिद्धीविनायक मंदिरात मंगळवारी दागिन्यांचा लिलाव
Eknath Khadse | तुर्तास तरी भाजपात प्रवेश नाही, दिल्लीवारी नंतर खडसेंचे स्पष्टीकरण
कॉंग्रेसने जात प्रमाणपत्र सदोष असूनही रश्मी बर्वेंना उमेदवारी का दिली? मनीषा कायंदे यांचा सवाल

Latest Marathi News सुनील नरेनचे झंझावाती अर्धशतक Brought to You By : Bharat Live News Media.