हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू

हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्लीतील सदर बाजार येथील कुरेश नगर भागात आज (दि.२ एप्रिल) भीषण दुर्घटना घडली. एका घराला लागलेल्या  आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले. दोन्ही मुलींनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले. त्यानंतर दोघांचाही तेथेच गुदमरून मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्‍या. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसी डक्टमधून धूर घरात शिरला. टीम गॅस मास्क घालून आत गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून अनाया (१२) आणि गुलाश्ना (१२) या दोन मुलींना बाहेर काढले. ज्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. दोघांचाही तेथेच गुदमरून मृत्यू झाल्‍याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. या दुर्घटनेचे कारण अद्‍याप स्पष्ट झालेले नाही.

Two girls died after a house caught fire in Delhi’s Sadar Bazar area; fire has been brought under control: Delhi Police
— ANI (@ANI) April 2, 2024

The post हृदयद्रावक! दिल्‍लीत घराला आग, दोन मुलींचा गुदमरून मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source