Jalgaon News | ठेकेदाराचा शॉर्टकट, नागरिकांचे जीव धोक्यात

Jalgaon News | ठेकेदाराचा शॉर्टकट, नागरिकांचे जीव धोक्यात

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा– भुसावळ नगरपालिकेने खडका रोड येथील भर रस्त्यात असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात पाईप व स्लॅब टाकण्यासाठी ठेकेदाराला काम दिले होते. अवघ्या काही दिवसातच त्या स्लॅब मधील आसरी व त्यामधील खडी मोजून घेण्याची अवस्था निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी तर त्या आसारीही धोकादायक ठरत आहे. त्यात रमजान महिना सुरू असल्याने खडका रोड या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात सायंकाळी नागरिकांची ये जा असते.
भुसावळ येथील खडका रोड या दुभाजक रस्त्या ठिकाणी रस्त्याच्या खालून मोठी सांडपाण्याची नाली गेलेली आहे. तिला स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी मोठे छिद्र साफसफाई करण्यासाठी ठेवण्यात आलेले मात्र हे छिद्र वाहतुकीला अडचणीचे ठरत होते तसेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेने असलेल्या दुकानदारांनी व त्यांच्या दुकान व्यवसायिकांच्या समोरील असलेल्या नालीतले पाणी नाल्यात काढण्यासाठी रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन टाकलेली होती. या दोन्ही ठिकाणी मोठे पाईप टाकण्याचे काम नगरपालिकेने ठेकेदाराला दिलेले होते. पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचाही ठेका ठेकेदाराला दिलेला होता मात्र ठेकेदाराने या पाईप वर टाकलेला स्लॅब महिनाभर ही पूर्ण झालेला नाही मात्र काम इतक्या निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत की त्या स्लॅब मधल्या आसारी बाहेर आलेले असून त्यातील खडे व खळी दिसू लागलेली आहे. यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या गाडीच्या टायरला लागल्यास मोठा अपघात होऊ शकतो.
सायंकाळी खडक रोड भागात मोठ्या प्रमाणात रमजान ईद निमित्त व्यवसायिक आपला व्यवसाय करण्यासाठी रोडवर लोटगड्या, गाड्यावर लावतात. या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याबाबत नगरपालिकेचे अभियंता बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराची बिल थांबण्यात आली असून त्याला सदरील स्लॅब दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रितेश बच्छाव, नगर अभियंता भुसावळ नगरपालिका
हेही वाचा :

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार
Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर, YS शर्मिला कडप्पामधून निवडणूक लढवणार
नागपूर : परिवर्तनाचे सर्वत्र वारे, जनता आमच्यासोबत : आदित्य ठाकरे

Latest Marathi News Jalgaon News | ठेकेदाराचा शॉर्टकट, नागरिकांचे जीव धोक्यात Brought to You By : Bharat Live News Media.