बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने फेटाळला 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  कोविड काळात “कोरोनिल” या पतंजलीच्या औषधीने कोरोना पूर्णपणे बरा होण्याच्या भ्रामक व खोट्या जाहिराती प्रसारित केल्याबद्दल पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव आणि प्रबंध संचालक आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दात फटकारून त्यांचा माफीनामा फेटाळून लावला. याप्रकरणी नव्याने माफीनामा सादर करून पुढच्या सुनावणीत पुन्हा व्यक्तिशः हजर राहण्याचे … The post बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने फेटाळला  appeared first on पुढारी.

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने फेटाळला 

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा:  कोविड काळात “कोरोनिल” या पतंजलीच्या औषधीने कोरोना पूर्णपणे बरा होण्याच्या भ्रामक व खोट्या जाहिराती प्रसारित केल्याबद्दल पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव आणि प्रबंध संचालक आचार्य बाळकृष्ण या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कडक शब्दात फटकारून त्यांचा माफीनामा फेटाळून लावला. याप्रकरणी नव्याने माफीनामा सादर करून पुढच्या सुनावणीत पुन्हा व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले. Baba Ramdev

इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.  या सुनावणीदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. भ्रामक व खोट्या जाहिराती प्रसारित करणे ताबडतोब थांबवा, असे २१ नोव्हेंबरच्या सुनावणीत स्पष्ट निर्देश देऊनही बाबा रामदेव यांनी दुसऱ्याच दिवशी पत्रकारपरिषद घेऊन आपल्या आयुर्वेद औषधींचा खोटा व भ्रामक प्रचार सुरु ठेवल्याबद्दल दोन्ही न्यायमूर्तींनी तीव्र नापसंती व्यक्त केली. Baba Ramdev

 याप्रकरणात निव्वळ माफी मागून तुम्ही न्यायालयाच्या आदेशाला सहजतेने घेऊ शकत नाही, अशा कडक शब्दांत फटकारून न्यायमूर्तींनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा फेटाळून लावला. पतंजलीचा प्रसारमाध्यम विभाग काही वेगळा नाही. मागच्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतरही भ्रामक व खोट्या जाहिरातींचा प्रचार सुरूच आहे. ही अतिशय गंभीर बाब असून पुढच्या आठवड्यात व्यक्तिशः हजर राहून माफीनामा सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

कोरोनावर ऍलोपॅथीमध्ये कुठलाही उपचार नाही, असा दावा बाबा रामदेव यांच्या पतंजलीने केल्यानंतरही केंद्रसरकारने कंपनीवर कारवाई का केली नाही? असा सवाल न्यायमूर्तींनी केला. त्यावर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी या मुद्याची दखल घेऊन पतंजली कपंनीने मोठी चूक केल्याचे सांगितले. बाबा रामदेव यांनी झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असून त्यांना शेवटची संधी दिली जावी, अशी विंनती बाबा रामदेव यांचे वकील बलबीरसिंग यांनी न्यायालयाला केली.

हेही वाचा 

Baba Ramdev Misleading Ads Case | बाबा रामदेव यांनी सुप्रीम कोर्टासमोर मागितली ‘बिनशर्त माफी’, ‘पतंजली’शी संबंधित प्रकरण काय?
दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनिल’वरील सुनावणी पुढे ढकलली
Baba Ramdev : पैलवानांच्या आंदोलनाला बाबा रामदेव यांचा पाठिंबा; बृजभूषण यांच्याविषयी म्हणाले…

Latest Marathi News बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टाने फेटाळला  Brought to You By : Bharat Live News Media.