धुळे लोकसभा मतदार संघात शोभाताई बच्छाव 5155 मतांनी आघाडीवर

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अति उत्साही कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीमुळे अचानक अठराव्या फेरीत भारतीय जनता पार्टीचे सुभाष भामरे यांना विजयी घोषित केल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. प्रत्यक्ष आकडेमोड केली असता आता हा संभ्रम संपला असून, 19व्या फेरी अखेर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना 5155 मतांची आघाडी मिळाली …

धुळे लोकसभा मतदार संघात शोभाताई बच्छाव 5155 मतांनी आघाडीवर

धुळे, Bharat Live News Media वृत्तसेवा : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी दरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अति उत्साही कार्यकर्त्यांच्या आकडेमोडीमुळे अचानक अठराव्या फेरीत भारतीय जनता पार्टीचे सुभाष भामरे यांना विजयी घोषित केल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत होते. प्रत्यक्ष आकडेमोड केली असता आता हा संभ्रम संपला असून, 19व्या फेरी अखेर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना 5155 मतांची आघाडी मिळाली आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. या संदर्भात 18 व्या फेरीचा निकाल अधिकृतपणे शासकीय स्तरावरून बाहेर येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी या निकालाचा आधार घेत बाहेर संदेश सोशल मीडियावरून प्रसारित केले. यामध्ये अठराव्या फेरीअखेर 3663 मतांनी सुभाष भामरे यांना आघाडी दाखवत त्यांचा विजय निश्चित असल्याचे मेसेज फिरत होते. मात्र प्रत्यक्षात याच संदेशांमुळे गोंधळाची स्थिती आणि संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली.
यानंतर काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, दिनेश बच्छाव यांनी मतमोजणी केंद्र गाठले. तर भाजपाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे हे देखील मतमोजणी केंद्रात दाखल झाले. त्यांच्यासमोर तीन ते चार फेऱ्यांची आकडेवारी तपासण्यात आली. यातून आता हा संभ्रम दूर झाला आहे. 19 व्या फेरीची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना 5 लाख 82 हजार 159 इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे सुभाष भामरे यांना 5 लाख 76 हजार 994 मते मिळाली आहेत.
काँग्रेसच्या बच्छाव यांना 5155 मतांची आघाडी मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्याचप्रमाणे मतमोजणी दरम्यान धुळे ग्रामीणच्या दोन मशीनचा डिस्प्ले बंद झाला झाला होता. आता या दोन मशीनच्या व्हीव्हीपॅट मध्ये पडलेल्या चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जाहीर केली. या दोन मशीनची आकडेमोड झाल्यानंतरच अधिकृतपणे निकाल जाहीर केला जाणार आहे.
हेही वाचा : 

Kalyan Lok Sabha Result : कल्याणची सुभेदारी तिसऱ्यांदा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे
Akola Lok Sabha : भाजपाने अकोला लोकसभेचा गड राखला! अनुप धोत्रे विजयी
Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर पूर्वमध्ये भाजपला धक्का; ठाकरे गटाचे संजय दिना पाटील विजयी