IPL 2024 : केकेआर – राजस्थानमधील सामन्याची तारीख बदलणार?

कोलकाता, वृत्तसंस्था : सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चा थरार सुरू आहे आणि दरम्यान लोकसभा निवडणुका पण होत आहेत. आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याचे सामनेही भारताच होणार आहेत आणि या दुसर्‍या टप्प्याच्या वेळापत्रकाची घोषणाही करण्यात आली आहे, पण रामनवमीमुळे केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ … The post IPL 2024 : केकेआर – राजस्थानमधील सामन्याची तारीख बदलणार? appeared first on पुढारी.

IPL 2024 : केकेआर – राजस्थानमधील सामन्याची तारीख बदलणार?

कोलकाता, वृत्तसंस्था : सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चा थरार सुरू आहे आणि दरम्यान लोकसभा निवडणुका पण होत आहेत. आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्याचे सामनेही भारताच होणार आहेत आणि या दुसर्‍या टप्प्याच्या वेळापत्रकाची घोषणाही करण्यात आली आहे, पण रामनवमीमुळे केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर होणार्‍या सामन्याच्या शेड्यूलमध्ये बदल करू शकते. या संदर्भात, दोन्ही फ्रँचायझी, राज्य संघटना आणि ब्रॉडकास्टर यांना संकेत देण्यात आले आहेत.
रामनवमीमुळे हा उत्सव देशभरातील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्यामुळे या दिवशी सामन्याला पुरेशी सुरक्षा देण्याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. या महिन्यापासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत असून या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआयने सामना पुढे ढकलण्याचा पर्यायही ठेवला आहे.
मीडिया रिपोर्टस्नुसार, बीसीसीआय आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (कॅब) कोलकाता पोलिसांच्या सतत संपर्कात आहेत. या प्रकरणी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु बीसीसीआयने संभाव्य बदलांबाबत फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टर या दोघांनाही संकेत दिल्याचे सांगण्यात येत आहे. (IPL 2024)
बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक दोन टप्प्यात केले. सुरुवातीला मंडळाने या स्पर्धेतील 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित 53 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रक तयार करताना बीसीसीआयने होम अवे फॉरमॅटला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल यूएईमध्ये होऊ शकते, असे मानले जात होते; परंतु बीसीसीआयने हे सर्व अंदाज फेटाळून लावले होते. मात्र, आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यात केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामना पुन्हा नियोजित करावा लागेल. आयपीएलच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, पोलिस प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच याबाबत निर्णय घेऊ.
आयपीएलच्या चालू हंगामात केकेआर आणि राजस्थान संघांची सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा तिसरा सामना आज (सोमवारी) वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी आहे, तर बुधवारी केकेआरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.
Latest Marathi News IPL 2024 : केकेआर – राजस्थानमधील सामन्याची तारीख बदलणार? Brought to You By : Bharat Live News Media.