वीज दरवाढीची सर्वसामान्यांना झळ पोहोचणार नाही : देवेंद्र फडणवीस

वीज दरवाढीची सर्वसामान्यांना झळ पोहोचणार नाही : देवेंद्र फडणवीस

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात वीज दरवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. परंतु सर्वसामान्य माणसावर या वीज दरवाढीचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने रचना केल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. Electricity price hike
एमईआरसीने जो काही निर्णय दिला आहे, त्यानुसार ही दरवाढ आहे. छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही, अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आलेली आहे. दरम्यान, महायुतीचे जवळपास तिकीट वाटप फायनल झाले आहे. सतत बैठकांविषयी छेडले असता बैठका कराव्याच लागतात. त्याशिवाय सीट फायनल होत नाही. Electricity price hike
आता आम्ही जवळपास पोहोचलो आहोत, आम्ही लवकरच उमेदवार घोषणा करू, दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात सर्व काही प्रश्न सुटला आहे, असेही फडणवीस म्हणाले. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील स्टार प्रचारक कोण हे देखील लवकरच जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा 

नागपूर जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व करणार महिला शक्ती
नागपूर : कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; १० दिवसात तिसरी घटना
नागपूर: विदर्भात उष्ण लहरींसह वादळी वारे वाहण्याचा इशारा

Latest Marathi News वीज दरवाढीची सर्वसामान्यांना झळ पोहोचणार नाही : देवेंद्र फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.