पंजाबमधील आपचे माजी खासदार धर्मवीर गांधींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे पंजाबच्या पतियाळा येथील माजी खासदार धर्मवीर गांधी यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. गांधी यांना भाजपच्या परनीत कौर यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करून धर्मवीर गांधी यांनी २०१५ मध्ये आप पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी … The post पंजाबमधील आपचे माजी खासदार धर्मवीर गांधींचा काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुढारी.

पंजाबमधील आपचे माजी खासदार धर्मवीर गांधींचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आम आदमी पक्षाचे पंजाबच्या पतियाळा येथील माजी खासदार धर्मवीर गांधी यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. गांधी यांना भाजपच्या परनीत कौर यांच्याविरोधात लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षात अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करून धर्मवीर गांधी यांनी २०१५ मध्ये आप पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केल्यानंतर धर्मवीर गांधी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचे संकेत होते. त्यानुसार धर्मवीर गांधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आपचा इंडिया आघाडीत  समावेश असला तरीही पंजाबमध्ये काँगेस आणि आप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.
Latest Marathi News पंजाबमधील आपचे माजी खासदार धर्मवीर गांधींचा काँग्रेसमध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.