बुलढाण्यात रंगत वाढली,भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल

नागपूर : दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलरोजी मतदान होऊ घातलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेला लोकसभेची जागा सुटलेली असताना भाजपचे नेते माजी आमदार विजयराव शिंदे यांनी सोमवारी (दि.१) उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजवून दिली आहे. Buldhana Lok Sabha विशेष म्हणजे विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे … The post बुलढाण्यात रंगत वाढली,भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल appeared first on पुढारी.

बुलढाण्यात रंगत वाढली,भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलरोजी मतदान होऊ घातलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता आहे. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेला लोकसभेची जागा सुटलेली असताना भाजपचे नेते माजी आमदार विजयराव शिंदे यांनी सोमवारी (दि.१) उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ माजवून दिली आहे. Buldhana Lok Sabha
विशेष म्हणजे विजयराज शिंदे यांनी एक अपक्ष आणि एक पक्षाकडून असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनर्सवर विजयराज शिंदेंना जागा दिली जात नसल्याने विजयराज शिंदे नाराज होते, त्यातूनच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Buldhana Lok Sabha
भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याच विजयराज शिंदे यांनी सांगितले असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे कट्टर विरोधक म्हणून विजयराज शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे एकीकडे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत खासदार जाधव यांना दिलासा दिला असताना आता भाजप नेते विजयराज शिंदे यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या समोर अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेची समजूत घातली गेली असताना आता भाजपला डॅमेज कंट्रोल करावे लागणार असल्याचे दिसते.
हेही वाचा 

नागपूर : मविआतच समझोता नाही; म्‍हणूनच वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत : ॲड. प्रकाश आंबेडकर
नागपूर : कुजलेल्या अवस्थेत आढळला वाघाचा मृतदेह; १० दिवसात तिसरी घटना
नागपूर: विदर्भात उष्ण लहरींसह वादळी वारे वाहण्याचा इशारा

Latest Marathi News बुलढाण्यात रंगत वाढली,भाजपचे विजयराज शिंदे यांचा अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.