नाशिकच्या उमेदवारीवर भुजबळ पुन्हा बोलले म्हणाले, जागा कुणालाही मिळो…

नाशिक :  लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्यापही महायुतीमधील काही जागांचा तिढा कायम आहे, त्यातच नाशिकच्या जागेचाही समावेश आहे. नाशिकच्या जागेवर महायुतीतील तीनही पक्षांचा दावा आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी दिली जाणार असल्याचे फीक्स झाल्याचे बोलले जात आहे. महायुतीत नाशिकची जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार असल्याची … The post नाशिकच्या उमेदवारीवर भुजबळ पुन्हा बोलले म्हणाले, जागा कुणालाही मिळो… appeared first on पुढारी.

नाशिकच्या उमेदवारीवर भुजबळ पुन्हा बोलले म्हणाले, जागा कुणालाही मिळो…

नाशिक :  लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र, अद्यापही महायुतीमधील काही जागांचा तिढा कायम आहे, त्यातच नाशिकच्या जागेचाही समावेश आहे. नाशिकच्या जागेवर महायुतीतील तीनही पक्षांचा दावा आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची उमेदवारी दिली जाणार असल्याचे फीक्स झाल्याचे बोलले जात आहे. महायुतीत नाशिकची जागा अजित पवार यांच्या गटाला जाणार असल्याची चर्चा आहे.
यावर छगन भुजबळ यांनी माझ्या उमेदवारीचा निर्णय दिल्लीतच झाला असून फडणवीस यांच्याकडून मी तसे कन्फर्म करुन घेतले असल्याचेही म्हटले होते. तर, शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार हेमंत गोडसे यांनी तर प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर नक्की अधिकृत घोषणा कुणाची होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
यावर पुन्हा एकदा छगन भुजबळांनी भाष्य केलं आहे. भुजबळ म्हणाले, कोणीही उमेदवारी मागू शकतात. त्याबाबत दु:ख नाही.  शिंदे गटाचे सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांनीही नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहरात तीन आमदार, जवळपास सत्तर नगरसेवक आहेत. त्यांनीदेखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे दावा दाखल केला म्हणून दु:ख मानण्याचे कारण नाही.  ज्या कोणाला उमेदवारी जाहीर होईल, त्याला निवडून आणण्यासाठी सगळे झटून काम करू असे भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :

Nashik Crime | माजी सैनिकासह इतरांना गंडा घालणाऱ्यास गोव्यातून अटक, नेपाळमध्ये पळण्याचा होता बेत
MS Dhoni Record : 20व्या षटकात धावांचा पाऊस पाडण्यात धोनी अव्वल! जाणून घ्या आकडेवारी
Lok Sabha Election 2024 | वेध लोकसभेचे; डॉ. व्यंकटेश काब्दे, ढाकणे यांचे अनपेक्षित विजय

Latest Marathi News नाशिकच्या उमेदवारीवर भुजबळ पुन्हा बोलले म्हणाले, जागा कुणालाही मिळो… Brought to You By : Bharat Live News Media.