उद्धव ठाकरे यांनी घेतली मीनाक्षी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट
रायगड: Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि.१) पेझारी येथे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, मीनाक्षी पाटील यांचे सुपूत्र शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांच्या कुटंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. Meenakshi Patil
यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रशांत मिसाळ, पिंटया ठाकूर, हेमंत पाटील, किशोर जैन, दर्शना पाटील, अविनाश पाटील, चंद्रहास पाटील, नरेश म्हात्रे आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जि.प. माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अर्थ सभापती चित्रा पाटील, जि.प. माजी सदस्या भावना पाटील, शैला पाटील, नृपाल पाटील, सवाई पाटील, सुमन पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सुरेश खोत, दीपक पाटील आदी शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा
Meenakshi Patil passed away : शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन
मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत: अजित पवार
Gautami Patil : ठाण्यातील शिंदे गटाच्या कार्यक्रमावर ‘का’ भडकल्या सुषमा अंधारे
Latest Marathi News उद्धव ठाकरे यांनी घेतली मीनाक्षी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट Brought to You By : Bharat Live News Media.