रामायण, गीता आणि… : केजरीवालांनी तिहार कारागृहात मागितल्‍या ‘या’ गोष्‍टी

रामायण, गीता आणि… : केजरीवालांनी तिहार कारागृहात मागितल्‍या ‘या’ गोष्‍टी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ‘ईडी’ काेठडीत असणारे आपचे सर्वेसर्वा आणि मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्‍लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज (दि.१ एप्रिल) १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिहार कारागृहामध्‍ये केजरीवाल यांनी तीन पुस्तकांची मागणी केली आहे.
केजरीवालांचे तपासात सहकार्य नाही : ईडी
आजच्‍या सुनावणीवेळी ‘ईडी’ने राऊस एव्हेन्यू कोर्टात सांगितले की, अरविंद केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत. ते सरळ उत्तरे देत नाहीत. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर एस व्ही राजू म्हणाले की, हे सर्व न्यायालयाला सांगण्याचा उद्देश हा आहे की, आम्ही भविष्यातही केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी करू शकतो. केजरीवाल यांनी अद्याप मोबाईल पासवर्ड शेअर केलेला नाही. सर्वच प्रश्‍नांची उत्तरे ते माहीत नाही, असे देत आहेत. केजरीवाल जाणूनबुजून तपास अन्‍य दिशेला वळवण्याचा प्रयत्न करत असल्‍याचा दावाही ईडीने केला. यानंतर न्‍यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्‍यायालयीन कोठडी सुनावली.
केजरीवालांनी तिहार कारागृहात मागितल्‍या ‘या’ गोष्‍टी
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये त्यांनी तीन पुस्तके तुरुंगात नेण्याची परवानगी मागितली आहे. या पुस्तकांमध्ये भगवद्गीता, रामायण आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राईम मिनिस्टर डिसायड्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्‍याचबरोबर कारागृहात आवश्यक औषधांचीही मागणी केली आहे. तसेच आपल्‍या सोबत असणारे धार्मिक लॉकेट तुरुंगात नेण्याची परवानगीही न्यायालयाकडे त्‍यांनी मागितली आहे. याशिवाय विशेष आहाराचीही मागणी करण्यात आली आहे. कारागृहात टेबल आणि खुर्ची देण्याची परवानगीही त्यांनी न्यायालयाकडे मागितली आहे.

#WATCH | On Delhi CM Arvind Kejriwal’s request to the court to allow him to carry three books including Bhagavad Geeta, Ramayan in jail, AAP national spokesperson Priyanka Kakkar says, “Our Chief Minister is an educated Chief Minister. He will utilize his time productively and… pic.twitter.com/mIJLSOmVv1
— ANI (@ANI) April 1, 2024

केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात
न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आल्‍यानंतर आता केजरीवालांची रवानगी तिहार कारागृहात झाली आहे. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिहार केजरीवाल यांना कोणत्या बॅरेकमध्ये ठेवण्यात येणार हे अद्याप ठरलेले नाही. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना तिहार कारागृहत क्रमांक दोनमधून कारागृह क्रमांक पाचमध्ये हलवण्यात आले आहे. मनीष सिसोदिया यांना तिहार कारागृह क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी सतेंद्र जैन यांना तिहार कारागृहातील सात क्रमांकाच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. च्या. कविताला लेडी जेल क्रमांक 6 मध्ये ठेवण्यात आले आहे.
तिहार कारागृहातील रोजची दिनचर्या कशी असते ?
तिहार कारागृहात एकूण नऊ तुरुंग आहेत, ज्यामध्ये सुमारे १२ हजार कैदी आहेत. या कारागृहात ईडी आणि सीबीआयशी संबंधित कैद्यांना ठेवण्यात आले आहे. कारागृहातील सर्व कैद्यांचा सारखाच दिनक्रम आहे. सूर्यादयाबरोबर कैद्यांच्या कोठडी आणि बराकी उघडल्या जातात. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी चहा आणि ब्रेड नाश्ता म्‍हणून दिला जातो. आंघोळीनंतर कोर्टात जायचे असेल किंवा कुणाला भेटायचे असेल तर त्याची तयारी केली जाते. सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास डाळ, एक भाजी आणि पाच रोट्या दिल्या जातात. रोटी खाण्याची इच्छा नसलेल्या कैद्याला भात दिला जातो. यानंतर कैद्यांना दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बॅरेकमध्ये बंद केले जाते. तीन वाजता कैद्यांना बॅरेकमधून बाहेर काढले जाते. 3.30 वाजता त्यांना चहा आणि दोन बिस्किटे दिली जातात. त्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास वकिलाला भेटायचे असेल तर कैदी भेटू शकतो. संध्याकाळी 5.30 वाजता, कैद्यांना रात्रीचे जेवण दिले जाते, ज्यामध्ये डाळ, एक भाजी आणि पाच रोट्या असतात. त्यानंतर 6.30 किंवा 7 वाजता सूर्यास्त झाल्यावर सर्व कैद्यांना कोठडीत बंद केले जाते.
कारागृहात कैद्यांना टीव्ही पाहण्याची परवानगी आहे. या कालावधीत बातम्या, क्रीडा आणि मनोरंजन वाहिन्यांचा समावेश असलेल्या केवळ 18 ते 20 चॅनेल पाहण्याची परवानगी आहे.
दारु घोटाळा प्रकरणी २१ मार्च रोजी केजरीवालांना अटक
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुमारे दोन तासांच्या चौकशीनंतर 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती. यानंतर राऊस एव्हेन्यू न्‍यायालयाने त्‍यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. यानंतर पुन्‍हा १ एप्रिलपर्यंत त्‍यांच्‍या ईडी कोठडीत वाढ करण्‍यात आली होती.
काय होते दिल्‍लीतील नवीन दारू धोरण?
22 मार्च 2021 रोजी दिल्‍लीचे तत्‍कालीन उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्‍लीसाठी नवीन दारू धोरण जाहीर केले होते. 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन मद्य धोरण म्हणजेच उत्पादन शुल्क धोरण 2021-22 लागू करण्यात आले. हे धोरण आल्यानंतर दिल्‍ली. सरकारचे दारू दुकानांवरील नियंत्रण खासगी यंत्रणेच्‍या हाती गेले. दारु व्‍यवसायातील माफिया राजवट संपेल आणि सरकारचा महसूल वाढेल, असा सरकारचा अंदाज होता. मात्र हे नवीन धोरण सुरुवातीपासूनच वादात राहिले. गोंधळ वाढल्यावर 28 जुलै 2022 रोजी सरकारने नवीन दारू धोरण रद्द करून जुने धोरण पुन्हा लागू केले होते.
हेही वाचा : 

ब्रेकिंग : केजरीवालांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
केजरीवाल, सोरेनांच्‍या सुटकेसह ‘इंडिया’ आघाडीने मांडल्‍या ५ मागण्या
केजरीवालांना अटक हा लोकशाहीवरील हल्‍ला : ‘इंडिया’ आघाडीच्‍या महासभेत शरद पवारांचा केंद्रावर हल्‍लाबोल

 
Latest Marathi News रामायण, गीता आणि… : केजरीवालांनी तिहार कारागृहात मागितल्‍या ‘या’ गोष्‍टी Brought to You By : Bharat Live News Media.