शिक्षिकेच्या बनावट इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ, फोटो

शिक्षिकेच्या बनावट इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ, फोटो

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शिक्षिकेचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून त्याद्वारे शाळकरी विद्यार्थ्यांना अश्लील मेसेज व्हायरल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अनोळखी व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली.
पोलिसांनी याची दखल घेऊन संशयिताचा शोध सुरू केला आहे. संबंधिताला लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले. अनोळखी व्यक्तीने एका शिक्षिकेच्या नावाने इन्स्टाग्रामवर चार बनावट खाती तयार करून विद्यार्थ्यांना फ—ेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्यानंतर छेडछाड केलेले अश्लील व्हिडीओ, फोटो विद्यार्थ्यांना पाठविले. 25 ते 28 मार्च या काळात हा प्रकार घडला.
शिक्षिकेच्या खात्यावरून अश्लील मेसेज आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Marathi News शिक्षिकेच्या बनावट इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ, फोटो Brought to You By : Bharat Live News Media.