परभणी: दस्तापूर-लोहगाव येथील पुलाला दुचाकी धडकून ममदापूरचा तरुण गंभीर जखमी

परभणी: दस्तापूर-लोहगाव येथील पुलाला दुचाकी धडकून ममदापूरचा तरुण गंभीर जखमी

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: दस्तापूर- सिंगणापूर ताडकळस रोडवरील दस्तापूर-लोहगाव संयुक्त शिवारातील गोलाई वळणावरील लोखंडी पुलाला दुचाकी धडकून कालव्यात पडून तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.३१) सकाळी १० च्या सुमारास घडली. अशोक सुंदरराव काळबांडे (वय ४५, रा. ममदापूर, ता. पूर्णा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर परभणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० च्या सुमारास अशोक काळबांडे सिंगणापूर येथून ममदापूर गावाकडे मोटारसायकलवरुन येत होता. यावेळी त्याचा ताबा सुटल्याने गोलाई वळणावरील लोखंडी पुलाला दुचाकी जोरदारपणे धडकून तो कालव्यात पडला. या अपघातात त्याच्या मांडीला, कंबरेला, डोक्याला मोठी दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत त्याला फिरत्या रुग्णवाहिकेतून परभणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले.
या अपघाताची माहिती ताडकळस पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.
हेही वाचा 

परभणी: पूर्णा रेल्वे स्थानकातून महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास
परभणी : डॉग तेजाकडून सेलू स्थानकासह रेल्वे गाड्यांची तपासणी
परभणी: कावलगाव येथे विवाहितेचा छळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News परभणी: दस्तापूर-लोहगाव येथील पुलाला दुचाकी धडकून ममदापूरचा तरुण गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.