भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे

भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : रशिया आणि युक्रेन युद्धची तीव्रता शनिवारी रात्री पुन्‍हा वाढली. रशियाने युक्रेनच्‍या अनेक भागांना लक्ष्‍य केले. रशियाने युक्रेनवर शनिवारी ( ३० मार्च) रात्री 16 क्षेपणास्त्रे डागली. याशिवाय 11 ड्रोन हल्लेही केले, असे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाने एका रात्रीत 16 क्षेपणास्त्रे आणि 11 ड्रोन हल्ले केले. टेलिग्रामवरील एका निवेदनात हवाई दलाने सांगितले की, युक्रेनने नऊ ड्रोन आणि नऊ क्षेपणास्त्रे पाडली आहेत. मात्र, उर्वरित क्षेपणास्त्रे आणि ड्रोन कुठे पडले? त्या लक्ष्यांची ओळख पटलेली नाही
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात रशियन हवाई हल्ल्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २२ फेब्रुवारी 2022 रोजी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले होते. गेल्‍या दोन वर्षांपासून हे युद्ध सुरुच राहिले आहे.
हेही वाचा : 

Russia-Ukraine War : युक्रेन युद्धाची दोन वर्षे
Russia-Ukraine War : रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला; ५ युक्रेनियन ठार, ३१ जखमी
Russia-Ukraine war : ‘युद्धातून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अन् युक्रेनच्या नागरिकांनी काय साध्य केले?…’ -जो बायडेन

 
 
Latest Marathi News भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे Brought to You By : Bharat Live News Media.